बहिरेश्वर ची श्री कृष्ण यात्रा भरपावसात उत्साहात संपन्न

बहिरेश्वर (प्रतिनिधी) - करवीर तालुक्यातील मौजे बहिरेश्वर येथील शेवटच्या सोमवारी भरणारी यात्रा यंदा भरपावसात उत्साहात संपन्न झाली.वरूण राजाने सकाळपासूनच तुफान बरसत संपुर्ण यात्रेचा आणि सर्व भाविक भक्तांच्या उत्साहावर जणू पाणीच फिरवले.
पहाटे श्री शेषशायी विष्णूच्या मूर्ती ला अभिषेक घालून भाविकांना दर्शनासाठी मंदीर खुले करण्यात आले. दुपारच्या सत्रात कोटेश्वर मंदीरातून वाजत गाजत पालखीचं आगमण तळ्यावर झाले त्यानंतर श्री कृष्ण देवस्थान समितीच्या वतीने दही हंडी व कृष्णलीला आदी कार्यक्रम घेण्यात आले.पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी पहाटे पासूनच दर्शनासाठी गर्दी केली होती. अबालवृद्धा सह बालचमूची पावसामुळे निराशा झाली तर मनोरंजनासाठी उभारलेले खाद्यपदार्थ स्टाॅल तसेच खेळाचे साहित्य यांचे अतोनात हाल झाले.म्हणावा तसा धंदा कुठल्याही स्टाॅलचा झाला नाही त्यामुळे व्यावसायिकामध्ये नाराजीचा सूर होता.
ग्रामपंचायत प्रशासनाने यात्रेच्या पार्श्वभूमीवर गावातील तसेच यात्रामार्गावर मुरूम टाकून सपाटीकरणासह पार्किंग व्यवस्था केली होती. भाविकांनी ही पावसाची रूपरेषा पाहुन दर्शन घेणे पसंत केले.
आमदार चंद्रदीप नरके, छत्रपती मालोजीराजे यांचे चिरंजीव यशराज राजे, गोकुळ दुध संघाचे माजी चेअरमन विश्वास राव पाटील आबाजी, बाबासाहेब देवकर,राजेंद्र सुर्यवंशी आदी लोकप्रतिनिधींनी दुपारच्या वेळेत दर्शन रांगेतून दर्शन घेतले.