२०२९ मध्ये आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका होऊन ते मुख्यमंत्री होतील, 'या' नेत्याने केला दावा

जालना : २०२९ मध्ये आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका होतील आणि आदित्य ठाकरे मुख्यमंत्री होतील असा दावा शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केला आहे.
काल रावसाहेब दानवे यांनी शिवसेना पुढील निवडणुकीपर्यंत राहत नाही असं वक्तव केलं होतं त्याला उत्तर देतानी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी 'मैदान अभी आगे है हम फिर वापस आने वाले है' अस म्हणत त्यांनी हा दावा केला आहे. रावसाहेब दानवे यांनी सिग्मा हॉस्पिटल मध्ये बसून माझा पराभव केला त्यांनी भाजपच्या नगरसेवकांसह आमच्याही नेत्यांना पैसे दिले त्यामुळे माझा पराभव झाला असे देखील खैरे म्हणालेत. ते आज जालना शहरात एका लग्न समारंभाप्रसंगी आले असताना बोलत होते.
परमेश्वरांनी त्यांना जालन्यात दाखवून दिलं
मी अजून पण त्याच थोबाड पाहिलं नाही आणि त्या माणसाला बोलत पण नाही.त्याने एक चांगला युतीचा खासदार पाडला, परमेश्वरांनी त्यांना जालन्यात दाखवून दिल. यावेळेस बदला निघाला बदला काही थांबत नाही.