ECU/SLD बाबत वाहनधारकांसाठी मार्गदर्शक सूचना जारी

कोल्हापूर (प्रतिनिधी) - वाहनधारकांना ECU (Electronic Control Unit) व SLD (Speed Limiting Device) संदर्भात विविध अडचणींचा सामना करावा लागत असल्याबाबत कोल्हापूर प्रादेशिक परिवहन कार्यालय व परिवहन आयुक्त कार्यालयात तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर वाहनधारकांना स्पष्ट माहिती मिळावी आणि आर्थिक फसवणूक टळावी, यासाठी मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत.
अधिकृत रेट्रो फिटमेंट केंद्र (Retro Fitment Centre - RFC) यांच्याकडून नियमानुसार सेवा दिली जात आहे का, याची तपासणी करण्यात येणार आहे. ज्या RFC कंपन्या किंवा केंद्रे सूचनांचे पालन करत नाहीत, अशा कंपन्यांविरोधात rto.09-mh@mah.gov.in या ईमेलवर तक्रार पाठवावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांनी केले आहे. अशा तक्रारी प्राप्त झाल्यास संबंधित कंपनीचे USER ID बंद करण्याचा प्रस्ताव परिवहन आयुक्त कार्यालयाकडे पाठवण्यात येईल.
ECU/SLD नोंदणी व तपासणीबाबत मार्गदर्शक सूचना :
1 ऑक्टोबर 2015 पूर्वी उत्पादीत जी वाहने वेग नियंत्रक बसविण्यापासून (MV Rule 118(1)) अन्वये सूट प्राप्त आहेत, अशा वाहनांची वाहन प्रणालीमध्ये मोटार वाहन निरीक्षक यांचे मार्फत नोंद घेऊन त्यास सहा. प्रादेशिक परिवहन अधिकारी यांचेकडून मान्यता देण्यात येते.
ज्या वाहनांमध्ये 16 अंकी Unique Idenfification Number नमूद असलेले Speed Limiting Device (SLD) बसविण्यात आले असेल, त्यांनी अधिकृत Retro Fitment Centre (RFC) मार्फत बाहन प्रणालीवर SLD बाबतची नोंद घ्यावी.
ज्या वाहनांना बाहेरून SLD उपकरण बसविले असेल व उपकरणावर 16 अंकी Unique Idenfification Number नमूद नसेल, परंतू SLD उपकरण सुस्थितीत असेल अशा बाबतीत उत्पादकांनी वाहन प्रणालीमध्ये 16 अंकी Unique Idenfification Number नमूद करताना अधिकृत वित्तरकाने शुल्क आकारू नये व 16 अंकी Unique Idenfification Number अद्ययावत करून द्यावा, अशा सूचना परिवहन आयुक्त यांनी सर्व वेग नियंत्रक उत्पादकांना दिल्या आहेत.
सर्व मान्यताप्राप्त वेग नियंत्रक कंपनी व त्यांचे Retro Fitment Centre (RFC) यांनीही परिवहन आयुक्त यांनी दिलेल्या सूचनांनुसार कार्यवाही करावी व वाहनधारकांना त्रास होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांनी केले आहे.