'HMPV' शी दोन हात करण्यासाठी 'महाराष्ट्र शासन' अलर्ट मोडवर

मुंबई : सध्या चीनमध्ये HMPV नावाचा व्हायरस धुमाकूळ घालत आहे. भारतातही या व्हायरसची पहिली केस नुकतीच सापडली आहे. भारतात पहिला रुग्ण सापडल्यानंतर भारताकडूनही खबरदारीच्या सूचना दिल्या जात आहेत. त्या अनुषंगाने कोरोना सारख्याच असणाऱ्या या संसर्गाशी दोन हात करण्यासाठी भारताची आरोग्य यंत्रणा सज्ज होताना दिसत आहे.
महाराष्ट्रातही आता या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागही सतर्क झाली आहे. “घाबरू नका, पण सावध राहा”, असा सल्ला राज्यातील आरोग्य विभागाच्या वतीनं नागरिकांना देण्यात येत आहे. सोबतच सर्दी आणि खोकल्याच्या रुग्णांचा नियमित सर्वेक्षण करण्याचे आदेशही अधिकाऱ्यांना देण्यात आले असून, राज्यात सर्वांनीच स्वच्छतेच्या नियमावलीचं पालन करण्याचं आवाहनही आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात येत आहे.