इचलकरंजीतील कुख्यात एसएन गँग वर 'मोक्का' अंतर्गत कारवाई
इचलकरंजी - इचलकरंजी शहराच्या परिसरात फाळकुट दादा म्हणून बदलौकीक निर्माण झालेल्या सलमान राजु नदाफ, वय २५ वर्ष, रा. इचलकरंजी याच्या नेतृत्वाखालील "एसएन गँग' या गँगचा वावर आहे. या गँगमध्ये असणाऱ्यांची नावे अविनाश विजय पडीयार, वय १९ वर्ष, रा. मूळ इचलकरंजी सध्या रा. यड्राव, अरसलान यासीन सय्यद, वय १९ वर्ष, रा. इचलकरंजी, यश संदीप भिसे, वय १९ वर्ष, रा. शहापूर, रोहित शंकर आसाल, वय १९ वर्ष, रा. खोतवाडी अशी असून या एसएन गँग १५ जुलै रोजी दुपारी २०.३० च्या सुमारास पुनम प्रशांत कुलकर्णी, वय ४३ वर्ष, रा. इचलकरंजी यांच्या ब्युटी पार्लरच्या ठिकाणी फटाके उडवत असताना त्यातील एक फटाका पुनम कुलकर्णी यांच्या पाशी येवून पडला. त्यानंतर पुनम कुलकर्णी यांनी फटाके अंगावर येत आहेत लांब जावून लावा असं म्हंटल्यानंतर गँगची दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने सलमान नदाफ याने डोक्यात दगड घालुन संपवूया असे म्हणत शिवीगाळ करत पुनम कुलकर्णी यांच्याकडे दगड फेकला.

या घटनेची फिर्याद पुनम कुलकर्णी यांनी इचलकरंजी पोलीस ठाण्यात नोंदवली. एसएन गँगवर गुन्हा दाखल झाल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी संघटित गुन्हेगारी टोळीच्या गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीचा आढावा घेतला. यामध्ये या गँगमधील सदस्यांवर याआधी गंभीर व दखलपात्र गुन्हे दाखल असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे पोलीस अधीक्षक यांनी अप्पर पोलीस अधीक्षक, गडहिंग्लज विभाग, कॅम्प इचलकरंजी आण्णासाहेब जाधव व उपविभागीय पोलीस अधिकारी, इचलकरंजी उपविभाग, इचलकरंजी विक्रांत गायकवाड यांना तातडीने संघटित गुन्हेगारीच्या समुळ उच्चाटनासाठी मोक्का कारवाईचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले. त्याप्रमाणे त्यांनी पोलीस निरीक्षक, इचलकरंजी पोलीस ठाणे महेश चव्हाण यांनी प्रस्ताव पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्याकडे सादर केला.
सादर केलेल्या प्रस्तावाच्या छाननी मध्ये गुन्ह्याचे प्राथमिक तपासात संघटित गुन्हेगारीचा प्रकार निष्पन्न झाला. तपासामध्ये सदर "एसएन गँग' या संघटित गुन्हेगारी संघटनेविरुध्द खूनाचा प्रयत्न, जबरी चोरी, खंडणी वसुली, एखाद्या व्यक्तीला हानी पोहोचवण्याच्या किंवा गुन्हा करण्यासाठी विष किंवा इतर हानिकारक पदार्थ सेवन करावयास लावणे, पुर्वग्रहदुषितरित्या प्राणघातक शस्त्रासह सार्वजनिक ठिकाणी गर्दीमारामारी करुन जखमी करणे, बंदी आदेशाचा भंग, फौजदारीपात्र धाकटदपटशा असे १७ गंभीर व दखलपात्र व १ अदखलपात्र असे एकुण १८ गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले.
सादर केलेल्या प्रस्तावाची स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने छाननी करून प्रस्ताव पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांच्याकडे सादर केला. पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी प्रस्तावाच्या कायदेशिर बाबी तपासून प्रस्ताव पुर्वपरवानगीसाठी विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र, कोल्हापूर सुनिल फुलारी यांच्याकडे सादर केला.
सक्षम प्राधिकारी सुनिल फुलारी यांनी छाननीअंती वर नमुद गुन्ह्यात सहभाग निष्पन्न झाले "एसएन गैंग' या संघटित गुन्हेगारी संघटनेविरुध्द मोका अधिनियमाचे वाढीव कलमांचा अंर्तभाव करणेस पुर्वपरवानगी देवून तसे आदेश निर्गमित केले. मंजुरी आदेशानुसार सदर गुन्ह्याचा पुढील तपास विक्रांत गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी, इचलकरंजी उपविभाग, इचलकरंजी यांचेकडे वर्ग करण्यात आला आहे. सदर "एनएन गँग' या संघटित गुन्हेगारी संघटनेच्या तसेच सदर परिसरातील अन्य संघटित गुन्हेगारी संघटनांच्या गुन्हेगारी कृत्यांना बळी पडलेल्या पिडीत व्यक्तींना तक्रार दाखल करावयाची असलेस नजीकच्या पोलीस ठाणेशी किंवा इचलकरंजी पोलीस ठाणेशी संपर्क साधावा असे याव्दारे आवाहन करण्यात येत आहे. त्याच प्रमाणे कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेला आवाहन करण्यात येते की, अशा स्वरुपाच्या गुन्ह्यांमध्ये सक्रिय असणारे गुन्हेगारांच्या गुन्हेगारी कृत्ये व अत्याचारास बळीकुन मारुन फिर्यादीस गंभीर जखमी केले. तसेच सर्व आरोपींनी मिळून फिर्यादीच्या ब्युटीपार्लरच्या खोलीच्या दरवाजाचे, बोर्डाचे व खिडकीचे आणि शेजारी राहणारे दयानंद लाड यांच्या दुकानाच्या शटरचे व सागर पाटील यांच्या संडासच्या दरवाजाचे नुकसान केले म्हणुन वगैरे फिर्याद दिलेने गुन्हा दाखल करणेत आला होता. सदर गुन्ह्याचा प्राथमिक तपास सपोनि पुनम माने, इचलकरंजी पोलीस स्टेशन यांनी केला आहे.
या कारवाईत कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या नेतृत्वाखाली अप्पर पोलीस अधीक्षक, गडहिंग्लज विभाग आण्णासाहेब जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी, इचलकरंजी उपविभाग, इचलकरंजी विक्रांत गायकवाड, यांचे मार्गदर्शनाखालील इचलकरंजी पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक महेश चव्हाण व त्यांचेकडील पोहवा उदय करडे, शहर उपविभाग कार्यालयाकडील पोहवा साजीद कुरणे, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, कोल्हापूर रविंद्र कळमकर व त्यांचेकडील सहा. फौज. सचिन पार्वती सुर्याजी पाटील अशांनी ही कामगिरी पार पाडली.




