'उद्धव ठाकरे म्हणजे पाकिस्तानचे एजंट, लादेनची भाषा बोलतायत'; मंत्री नितेश राणेंचा घणाघाती हल्ला

'उद्धव ठाकरे म्हणजे पाकिस्तानचे एजंट, लादेनची भाषा बोलतायत'; मंत्री नितेश राणेंचा घणाघाती हल्ला

मुंबई: शिवसेना (UBT) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी जुलैपासून जाहीर केलेल्या राज्यव्यापी 'रामरक्षा आंदोलना'वरून सत्ताधारी भाजप आणि ठाकरे गटात जोरदार कलगीतुरा रंगला आहे. भाजप नेते आणि राज्याचे मंत्री नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर अत्यंत बोचऱ्या शब्दांत टीका केली असून, त्यांची तुलना थेट 'पाकिस्तानी एजंट'शी केली आहे.

'उद्धव उल हक' म्हणत नितेश राणेंचा प्रहार
विधानभवन परिसरात प्रसारमाध्यमांशी बोलताना नितेश राणे कमालीचे आक्रमक झाले होते. ते म्हणाले, “आज पुन्हाउद्धव उल हकयांची पत्रकार परिषद झाली. उद्धव ठाकरे हे हुबेहूब पाकिस्तानच्या एजंटसारखेच बोलत आहेत. राम मंदिराच्या निमित्ताने ते बहुदा ओसामा बिन लादेनची भाषा बोलत असावेत. ते स्वतः मुख्यमंत्री असताना त्यांनी हिंदूंची मंदिरे बंद ठेवली आणि अजान स्पर्धा भरवल्या. आता मात्र हिंदू राष्ट्राला बदनाम करण्यासाठी त्यांनी ही नवीन नौटंकी सुरू केली आहे.”

पाकिस्तानातील 'अब्बां'ना खूश करण्याचा प्रयत्न
 राणेंनी पुढे तोफ डागत म्हटले की, “उद्धव ठाकरेंनी कोणत्याही मंदिरात कितीही महाआरत्या केल्या, तरी त्यांना कोणताही देव पावणार नाही. निवडणुकीसाठी राम मंदिर हा आमचा राजकीय विषय नाही. केवळ पाकिस्तानात बसलेल्या अब्बांना खूश करण्यासाठी ठाकरे अशी विधाने करत आहेत. उद्धव ठाकरे आणि प्रभू श्रीराम यांचा दुरान्वयेही संबंध नाही.”

ठाकरेंच्या आंदोलनाची पार्श्वभूमी
 अयोध्येतील राम मंदिरात कथित 'दानचोरी' झाल्याचा आरोप करत उद्धव ठाकरे यांनी जुलै रोजी मुंबईतील दादर येथील हनुमान मंदिरापासून राज्यव्यापी 'रामरक्षा आंदोलनाची' घोषणा केली आहे. या आंदोलनात सर्व रामभक्तांनी आणि बाळासाहेबांचे विचार सोडलेल्यांनी (एकनाथ शिंदेंना टोला लगावत) सहभागी व्हावे, असे आवाहन ठाकरेंनी केले होते. त्यावर आता भाजपने हा पलटवार केला आहे.