कोल्हापूर जिल्हा बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत 'हा' ठराव मांडणार - चेअरमन विलास पाटील
कोल्हापूर (प्रतिनिधी) - कोल्हापूर जिल्हा हा पश्चिम महाराष्ट्रात सदन जिल्हा म्हणून ओळखला जातो. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्रात सहकार चळवळ रूजवून कोल्हापूर जिल्हा विकसित करण्याचे काम केले. तसेच समाजात अग्रेसर असणारे कार्यकर्त्यांनी सहकारी संस्थांना उभारी देण्यासाठी काम केले. मात्र काही वर्षांपासून अतिवृष्टी होऊन शेतकऱ्यांच्या ऊस पिकाचे नुकसान होत आहे. 8 सप्टेंबर रोजी कोल्हापूर जिल्हा बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा होणार आहे. या सभेमध्ये सन 2025 - 26 सालातील शेती कर्जाच्या वसूल पात्र रकमेची व्याजासह समान 9 हप्त्यांमध्ये पूनर्घटन व्हावे असा ठराव मांडण्यात येणार असल्याची माहिती गगनबावडा तालुका विविध कार्यकारी विकास सेवा संस्था मर्यादित गगनबावडा चे चेअरमन विलास पाटील यांनी दिली आहे.

चेअरमन विलास पाटील म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पश्चिमेच्या बाजूला असणाऱ्या 50 ते 55 हजार लोकसंख्या असणाऱ्या दूर्गम व डोंगराळ भाग असणाप्या गगनबावडा तालूक्यात गेले 4 वर्षे अतिवृष्टीने थैमान घातले असून सन 2022 साली 22 वेळा सन 2023 साली 13 वेळा सन 2024 साली 11 वेळा 2025 साली 30 वेळा अतिवृष्टी सदृश पाऊस झाला असल्याचा अहवाल गगनबावडा तालुक्यातील तहसिलदार यांचा दिवस निहाय आकडेवारीचा दाखला हाती लागला असून तालुक्यातील शेतकऱ्यांच्या उपजिविकेचे साधन असणारे ऊस पीक पूर्ण वाया गेले असून या वर्षी लागणाऱ्या माहे 16 मे पासून पावसाने अक्शरशा ऊस पीक कूजून गेले आहे.
त्यामुळे तालुक्यातील शेतकरी पूर्ण चिंतेत असून आत्महत्येच्या विचाराधीन आहे. तालूक्याचा विच्यार केला तर गगनबावडा तालुक्यांमध्ये 76 विविध कार्यकारी विकास सेवा संस्था कार्यरत असून बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया, यांची शाखा कार्यरत आहे. या सर्व बँकांचे व सोसायटीचे शेती कर्जाचे ऊस पीक व मध्यम मूदत मिळून एकूण 400 कोटींचे कर्ज वाटप आहे. त्यामुळे सदरचे कर्ज फेडणे अवघड झाल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे यावर उपाययोजना करण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर, करवीरचे आमदार चंद्रदीप नरके, गगनबावडा तालुक्याकडे जे दत्तक म्हणून पाहतात ते आमदार सतेज पाटील यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधींनी लक्ष देणे गरजेचे आहे. नाहीतर तालूक्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढतील.
याबाबत तालुक्यातील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांनी वार्षिक सर्वसाधारण सभेत गगनबावडा विकास सेवा संस्थेचे चेअरमन म्हणून माझ्या नावावर जिल्हा बँकेला 2025 - 26 या सालातील वसूल पात्र रक्कमेची व्याजासह समान 9 वर्षे मूदतीने पूनर्घटन करण्यासाठी प्रतिनिधी म्हणून सर्व अधिकार दिले आहेत. त्यामुळे 8 सप्टेंबरच्या कोल्हापूर जिल्हा बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ठराव मांडणे गरजेचे असल्याचे सर्व तालुक्यातील शेतकरी वर्गाचे मत आहे. या सर्व संकटातून मूक्त करणेसाठी गगनबावडा तालुक्यातील कर्जदार शेतकऱ्यांचे सन 2025 - 26 सालातील वसूल पात्र रक्कमेची व्याजासह समान 9 वर्षे मूदतीने पूनर्घटन करणे क्रम प्रात आहे. तसे जिल्हा बँकेला ठराव मांडून शासनदरबारी पाठवून त्याचा पाठपुरावा करून घेऊन लवकरात लवकर सर्व शेतकऱ्यांना चिंतेतून मूक्त करावे अशी मागणीही चेअरमन विलास पाटील यांनी केली आहे.




