बँकेची वाटचाल प्रगतीकडे की अधोगतीकडे ? - प्रसाद पाटील

बँकेची वाटचाल प्रगतीकडे की अधोगतीकडे ? - प्रसाद पाटील

कोल्हापूर (प्रतिनिधी) - शिक्षक बँक कोल्हापूर च्या सन 2024 - 25 अहवाल पाहता बँकेचा व्यवस्थापन खर्च वाढला असून ठेवीत घट झाली आहे. तसेच ठेवीदारांसह कर्जदारांनीही बँकेकडे पाठ फिरवल्याने कर्ज वितरण कमी दिसत असून चालू सालाचा नफाही कमी झाला आहे. यावरून बँकेची वाटचाल प्रगतीकडे आहे कि अधोगतीकडे असा सवाल बँकेचे माजी संचालक प्रसाद पाटील यांनी केला आहे.

       

उद्याच्या जनरल सभेत अहवालतील आकडेवारीवर सनदशीर मार्गाने विचारलेल्या प्रश्नांची सविस्तर सनदशीर मार्गाने संचालक मंडळाकडून मिळावीत अशी अपेक्षा प्रसाद पाटील यांनी व्यक्त केली आहे.

बँकेला विचारेल्या प्रश्नात अहवाल अहवाल सालात मागील अनेक वर्षाच्या तुलनेत थकव्याज तरतुद वाढली आहे, मागील अनेक वर्षाच्या तुलनेत कर्जावरील येणेव्याज वाढले आहे, मागील वर्षांची म्हणजे सन 2024 च्या बी.डी.डी.आर. (बुडीत कर्ज निधी) तरतुद 2 कोटी 66 लाख या अहवाल सालात करण्यात आली आहे याचा सकारण खुलासा व्हावा, अहवाल सालात थकबाकीचे प्रमाण वाढले असून ती 4 कोटी 97 लाख थकबाकी दिसत आहे. थकबाकी प्रमाण वाढण्याचे कारण स्पष्ट व्हावे, व थकबाकीदार यादी जाहीर व्हावी, मार्च 2023 अखेर 3 लाख 59 हजार ॲडव्हान्स येणे दिसत होता मार्च 2025 अखेर 70 लाख 83 हजार ॲडव्हान्स येणे दिसत आहे. इतकी मोठी रक्कम ॲडव्हान्स संचालकांकडे, कर्मचाऱ्यांकडे कि कोणाकडे आहे?  त्याची यादी जाहीर करावी. व संबधिताकडून सदर रक्कम व्याजासह वसूल करावी, राधानागारी जागा खरेदी रक्कम अडकूण पडली आहे त्याचा खुलासा व्हावा, अहवाल सालात संचालक मिटींग भत्ता 4 लाख 42 हजार, संचालक कमिटी मिटींग भत्ता 2 लाख 29 हजार, शाखा व्यवस्थापन खर्च 8 लाख 87 हजार, जनरल सभा खर्च 3 लाख 88 हजार हे खर्च मागील अनेक वर्षाच्या तुलनेत वाढलेले दिसत आहेत. ही सभासदांच्या घामाच्या पैशाची उधळपट्टी नव्हे काय? याचा सकारण खुलासा व्हावा, सत्तेवर येताना सभासदांना सर्व प्रकारच्या कर्जावर एक अंकी व्याजदर व दोन अंकी डिव्हिडंड असे आश्वासन दिले होते.

सत्तेवर येवून तीन वर्षे झाली तरी आपणांस ते जमलेले नाही. तेव्हा सभासद हितासाठी मागील एकूण सर्व कर्जाचा व्याजदर 9 टक्के करुन 10+ डिव्हिडंड लवकरात लवकर मिळावा ही विनंती. तसे केलेस सभासदांच्या वतीने सर्व संचालक मंडळाचा जाहीर सत्कार करण्याचे आम्ही यापूर्वीच जाहीर केले आहे. ती संधी लवकर मिळावी.

ज्या संचालक मंडळाने सुरेश कोळी यांना बँकेचे चेअरमन व व्हाईस चेअरमन केले. तेच संचालक मंडळ, त्यांना संचालक पदासाठी अपात्र ठरवू पाहत आहेत. हा सहकारतील मोठा विनोदच आहे. याबाबत  जिल्हा उपनिबंधक यांचेकडे सुनावणी सुरु असल्याचंही माजी संचालक प्रसाद पाटील म्हणाले.