कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर; नदीकाठच्या लोकांना सतर्क राहण्याचे प्रशासनाकडून आवाहन

कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर; नदीकाठच्या लोकांना सतर्क राहण्याचे प्रशासनाकडून आवाहन

कोलहापूर (प्रतिनिधी) - कोल्हापूर जिल्ह्यात जोरदार पावसाने हजेरी लावली असून, त्यामुळे शेतीच्या कामांना गती मिळाली आहे. मात्र, काही भागांत पावसामुळे नदी, नाले आणि ओढे ओसंडून वाहू लागले आहेत. परिणामी, विविध बंधाऱ्यांतील पाणीपातळीही झपाट्याने वाढत आहे.

गडहिंग्लज पाटबंधारे उपविभागाच्या माहितीनुसार, आजरा तालुक्यातील धनगरवाडी लघुप्रकल्प आज सकाळी १० वाजता पूर्ण क्षमतेने भरला असून, सांडव्यावरून तसेच सेवाद्वारांमधून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर असाच राहिल्यास विसर्गात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हिरण्यकेशी नदीच्या पात्रातील पाणीपातळी वाढू शकते. प्रशासनाने नदीकिनारी राहणाऱ्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.