गहिनीनाथ गैबी पीर चरणी कागल सिनियर घाटगे घराण्याचा मानाचा चौथा गलेफ विधीवत अर्पण

गहिनीनाथ गैबी पीर चरणी कागल सिनियर घाटगे घराण्याचा मानाचा चौथा गलेफ विधीवत अर्पण

कागल (प्रतिनिधी) - कागल येथील ऐतिहासिक श्री गहिनीनाथ गैबी पीर उरूस सोहळ्याच्या निमित्ताने कागल सिनियर घाटगे घराण्याचा मानाचा व पारंपरिक चौथा गलेफ विधीवत अर्पण करण्यात आला.शाहू ग्रुपचे अध्यक्ष आणि छत्रपती शाहू महाराज यांच्या जनक घराण्याचे वंशज राजे समरजितसिंह घाटगे व राजे वीरेंद्रसिंह घाटगे यांच्या हस्ते भक्तिमय वातावरणात गलेफ अर्पण केला.

उरूसातील आजचा दिवस मुख्य दिवस म्हणून ओळखला जातो.या दिवशी अर्पण होणारा चौथा गलेफ अत्यंत मानाचा मानला जातो.गेल्या अनेक पिढ्यांपासून हा मान कागल सिनियर घाटगे घराण्याचा असून, राजपरिवारातील सदस्यांच्या हस्ते व नागरिकांसह भाविक भक्तांच्या उपस्थितीत पारंपरिक वाद्यांच्या गजरात,फटाक्यांच्या आतषबाजीत भक्तिमय वातावरणात हा विधी पार पडला.

त्यानंतर सालाबाद प्रमाणे भिकाजी रेळेकर यांच्या घरी आयोजित सत्यनारायण पूजेचे दर्शनसुद्धा घाटगे बंधूनी घेतले. गलेफ अर्पणानंतर उपस्थित मान्यवरांनी श्री गहिनीनाथ गैबी पीर चरणी नतमस्तक होऊन भावपूर्ण प्रार्थना केली. 

यावेळी उरुस समितीचे अध्यक्ष रणजीत पाटील, शाहू साखर कारखान्याचे संचालक रमेश माळी,सतीश पाटील,राजे बँकेचे उपाध्यक्ष उमेश सावंत,संचालक दीपक मगर,अरुण गुरव,सुशांत कालेकर,माजी उपनगराध्यक्ष संजय कदम, राजेन्द्र जाधव,सुर्यकांत कदम,रमीज मुजावर,हिदायत नायकवडी,बाळासो नाईक,गजानन माने व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.