अशोकराव माने स्मृतीदिनानिमित्त अंबप येथे विविध उपक्रम

अशोकराव माने स्मृतीदिनानिमित्त अंबप येथे विविध उपक्रम

कोल्हापूर (प्रतिनिधी): लोकनेते बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अशोकराव माने यांचा २० वा स्मृतिदिन विविध उपक्रमांनी अंबप येथे झाला.सामाजिक, राजकीय, शैक्षणिक सहकार क्षेत्रातील मान्यवर व परिसरातील कार्यकर्त्यांनी स्मृतिस्थळी उपस्थित राहून अभिवादन केले. 

यावेळी झालेल्या आरोग्य शिबिरात ३०० रुग्णांची तपासणी झाली.वत्सला माने, संस्था अध्यक्ष विजयसिंह माने, कार्याध्यक्ष विकासराव माने, भाग्यश्री सूर्यवंशी, माजी जिल्हा परिषद सदस्या मनीषा माने, सरपंच दीप्ती माने यांच्या हस्ते स्मृतिस्थळी पूजन केले. कार्यक्रमस्थळी अभंगवाणी हा कार्यक्रम झाला. रात्री भजनाचा कार्यक्रम झाला.

आमदार डॉ. अशोकराव माने, जनसु-राज्यचे युवा प्रदेशाध्यक्ष समित कदम, जिल्हा बँकेच्या संचालिका श्रुतिका काटकर, 'गोकुळ'चे माजी अध्यक्ष नवीद मुश्रीफ, उप-महापौर अक्षय जरग, माजी आमदार डॉ.सुजित मिणचेकर, माजी सभापती प्रवीण यादव, ए. वाय. पाटील, सभापती सारिका नांदेकर, अमित कदम, जि.प. सदस्या सोनाली सावंत, अतिश शिंगे, कपिल पाटील, पो.नि. विजय घेरडे, अविनाश मेश्राम, प्रसाद पाटील, अविनाश बनगे, दादासाहेब लाड, डॉ. डी. एस. घुगरे आदी उपस्थित होते.