कॅप्टन डॉ.रवींद्र चुडामणी पाटील यांची रयत शिक्षण संस्थेच्या आजीव सेवक पदी निवड
कोल्हापूर (प्रतिनिधी): राजर्षी छत्रपती शाहू कॉलेज, कोल्हापूर मधील सहयोगी प्राध्यापक व NCC विभागप्रमुख कॅप्टन डॉ. रवींद्र चुडामणी पाटील यांची रयत शिक्षण संस्थेच्या आजीव सेवक (Life Worker) पदी निवड झाली.

त्यांच्या या निवडीबद्दल सरोज पाटील, (जनरल बॉडी सदस्य, रयत शिक्षण संस्था, सातारा), संगीता पाटील (चेअरमन, महाविद्यालय विकास समिती), प्रशांत पाटील (जनरल बॉडी सदस्य, रयत शिक्षण संस्था, सातारा), प्रा. डॉ. डी. आर. भोसले (प्र- प्राचार्य, राजर्षी छत्रपती शाहू कॉलेज, कोल्हापूर), देवदत्त कदम (लाईफ मेंबर, रयत शिक्षण संस्था सातारा) यांनी अभिनंदन करीत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.




