जिल्हा परिषदमार्फत राबविण्यात येणाऱ्या 'या' योजनांचा शेतकऱ्यांनी लाभ घ्या - मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस.

जिल्हा परिषदमार्फत राबविण्यात येणाऱ्या 'या' योजनांचा शेतकऱ्यांनी लाभ घ्या - मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस.

कोल्हापूर (प्रतिनिधी) - पशुसंवर्धन विभाग, जिल्हा परिषद कोल्हापूर मार्फत सन २०२५-२६ मध्ये जिल्हा परिषद स्वनिधीमधून ५० टक्के अनुदानावर कडबाकुट्टी यंत्र वाटप आणि ७५ टक्के अनुदानावर विधवा/परितक्त्या/ दाद्रियरेषेखालील महिलांना २ शेळी गट वाटप योजना अशा योजना राबविण्यात येत आहेत. या योजनांचा लाभ शेतकऱ्यांनी घ्या असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांनी केले आहे. 

सदर योजनांसाठी खालीलप्रमाणे निकष आहेत - 

१. ५० टक्के अनुदानावर कडबाकुट्टी यंत्र वाटप

२. लाभार्थीकडे लहान मोठी किमान ५ जनावरे असावीत.

३. लाभार्थीकडे वैरण उत्पादनासाठी जमिन असावी.

४. लाभार्थीकडे विज जोडणी असावी.

५. लाभार्थीने इतर योजनेतुन कडबाकुट्टी यंत्राचा लाभ घेतलेला नसावा.

६. ७५ टक्के अनुदानावर विधवा/परितक्त्या/ दाद्रियरेषेखालील महिलांना २ शेळी गट वाटप

७. सदरची योजना जिल्हयातील विधवा, परितक्त्या किंवा दारीद्रय रेषेखालील महिला लाभार्थीसाठी आहे.

८. योजनेतील लाभार्थीचे वय १८ ते ६० वर्ष या दरम्यान असावे.

९. लाभार्थीकडे शेळीपालनासाठी पुरेशी जागा उपलब्ध असावी.

योजनांचे अर्ज १५ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर पर्यंत पशुवैद्यकिय दवाखान्यांमार्फत पंचायत समिती स्तरावर स्विकारण्यात येत आहेत या संदर्भात नजिकच्या पशुवैद्यकिय दवाखान्यांशी संपर्क साधावा असेही मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. म्हणाले.