निवडेत अरुण पाटील यांची पुन्हा पोलीस पाटीलपदी नियुक्ती

पन्हाळा (प्रतिनिधी) - पन्हाळा तालुक्यातील निवडे गावात स्थानिक विरोध असूनही अरुण उर्फ युवराज पाटील यांची पुन्हा पोलीस पाटीलपदी नियुक्ती करण्यात आली आहे. काही ग्रामस्थांनी त्यांच्या वर्तनावर आक्षेप घेत प्रांताधिकारी समीर शिंगटे यांच्याकडे नियुक्ती रद्द करण्याची मागणी केली होती.
ए.के. पाटील, संतु पाटील, नाथा पाटील, रघुनाथ सुतार, मारुती चव्हाण, ज्ञानदेव पाटील, सदाशिव तांदळे, शरद मोरे आदींनी याबाबत लेखी निवेदन दिले होते. दिलेल्या निवेदनाला झुगारून पुन्हा एकदा पोलीस पाटीलपदी अरुण उर्फ युवराज पाटील यांच्या कामाची दखल घेत नियुक्ती करण्यात आली आणि शासनाकडून पाटील यांना अधिकृत नियुक्तीपत्र देण्यात आले.
"गावात शांतता नांदावी यासाठी मी प्रयत्न करणार आहे," अशी प्रतिक्रिया नूतन पोलीस पाटील अरुण पाटील यांनी दिली.
प्रांताधिकारी समीर शिंगटे यांनीही गावात कायदा - सुव्यवस्था अबाधित राहील, अशी ग्वाही दिली आहे. नियुक्तीनंतर गावात आनंदाचे वातावरण पसरले आहे.