पहिले नातीचे, मग स्वत:च्या अंगावरील कपडे काढले; धक्कादायक घटना समोर

पहिले नातीचे, मग स्वत:च्या अंगावरील कपडे काढले; धक्कादायक घटना समोर

पुणे (प्रतिनिधी) : पुण्यातील पर्वती पायथ्याजवळील एक धक्कादायक घटना समोर आली. 70 वर्षीय आजोबाने सख्ख्या 9 वर्षांच्या नातीवर अत्याचाराचा प्रयत्न केला. शेजाऱ्यांना मुलीचा आरडाओरडा ऐकू आल्यानंतर ते घराजवळ पोहोचले आणि त्यामुळे मोठा अनर्थ टळला. या नराधम आजोबावर पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत. 

सदर प्रकरणी चिमुकलीवरील अनर्थ कसा टळला याबाबत माहिती समोर आली आहे. नातू आणि नात आरोपी आजोबाला भेटण्यासाठी आले होते. आरोपीने नातूला पैसे दिले आणि खाऊ खाऊन ये असं सांगितलं. नंतर आरोपीने नातीच्या अंगावरील कपडे काढले आणि स्वतःच्या अंगावरीलही कपडे काढले. आरोपी पत्र्याच्या घरात राहिला असल्याने एका महिलेचे लक्ष गेलं आणि हा सगळा प्रकार उघडकीस आला.

पर्वती पोलीस स्थानकाचे पोलीस निरिक्षक राजेंद्र सहाणे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणाची माहिती दिली. काल (5 मे) रात्री 9.30 वाजता एक माहिती मिळाली की, एका आरोपीला लोकांनी पकडून ठेवलं होतं ज्याने स्वत:च्या नातीवर अत्याचार केल्याचा प्रयत्न केला. हा त्या मुलीचा सख्खा आजोबा आहे, जो 70 वर्षांचा आहे. त्याच्या विरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाळाची प्रकृती चांगली असून तिला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलं आहे. सध्या परिस्थिती शांत आहे . पुढील कारवाई आम्ही करत आहोत, अशी माहिती पोलिसांनी दिली. 

सदर प्रकार नागरिकांनी पाहिल्याने अनर्थ टळला. नागरिकांमुळे पीडितेची नरधमाच्या तावडीतून सूटका झाली. यानंतर घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले. मात्र आरोपीला आमच्या ताब्यात द्या, अशी मागणी करत स्थानिकांनी पर्वती पोलीस स्थानकाबाहेर गर्दी केली. संतप्त नागरिकांनी पर्वती पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केलं. मोठ्या प्रयत्नानंतर पोलिसांनी नागरिकांना शांत केलं.