नवापूरात बर्ड फ्ल्यू: 1.5 लाख कोंबड्या व 20 हजार अंडी नष्ट, प्रशासन अलर्ट मोडवर

नवापूरात बर्ड फ्ल्यू: 1.5 लाख कोंबड्या व 20 हजार अंडी नष्ट, प्रशासन अलर्ट मोडवर

नंदुरबार (प्रतिनिधी) : नंदुरबारच्या नवापूर परिसरात बर्ड फ्ल्यूचा उद्रेक झाल्याचे चित्र आहे. बर्ड फ्ल्यूच्या प्रादुर्भाव लक्षात घेता शहरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून प्रशासनाच्या वतीने मोठे कलिंग ऑपरेशन सुरू आहे.नवापूरमध्ये बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव लक्षात घेता प्रशासन सतर्क झाले असून जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी यांनी बाधित क्षेत्राला भेट दिली आहे.

यावेळी 150 कर्मचाऱ्यांच्या 25 पथकांकडून कलिंग ऑपरेशन सुरू करण्यात आले असून आतापर्यंत 50 हजार कोंबड्यांचे कलिंग करण्यात आले असून 40 हजार अंडी नष्ट करण्यात आली आहे.संसर्ग रोखण्यासाठी 1, 2 आणि 4 किमी परिघात निर्बंध लागू करण्यात आले असून तीन फार्ममध्ये एकूण दीड लाख कोंबड्यांचे कलिंग नियोजित करण्यात आले आहे.

या सोबतच इतर फार्मचे नमुने भोपाळच्या प्रयोगशाळेत तपासाठी पाठवण्यात आले आहे. तर या तपासाचा अहवाल प्रतीक्षेत असून त्यानंतर एकंदरीत परिस्थिती कळू शकणार आहे.दरम्यान, या परिसरातील नागरिकांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.परिणामी पोल्ट्री व्यवसायिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं असून या संदर्भात काळजी घेण्याच्या सूचनाही प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.