बहिरेश्वर येथील अपघातग्रस्त युवकाचा मृत्यू

बहिरेश्वर येथील अपघातग्रस्त युवकाचा मृत्यू

बहिरेश्वर (प्रतिनिधी) - करवीर तालुक्यातील मौजे बहिरेश्वर येथील युवक विशाल निवृत्ती दिंडे वय वर्ष 29 यांचा रविवार  13 जूलै रोजी महे बीड दरम्यान दुचाकीवरून घरी येत असताना अपघात झाला होता. अपघातात त्याच्या डोक्याला मार लागला होता. अपघातानंतर बेशुद्ध अवस्थेत त्याला खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. या घटनेची नोंद करवीर पोलीस ठाण्यात झाली आहे 18 जुलै रोजी पहाटे त्याचा रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

विशाल उच्चशिक्षित होता शिवाय तो खाजगी क्लास चालवायचा त्यामुळे त्याचा शिष्य परिवार मोठा होताच तसेच मनमिळाऊ स्वभावामुळे त्याचा मित्रपरिवार ही मोठा होता. त्याच्या पश्चात आई- वडील बहिण आजी असा परिवार आहे.एकुलत्या एक विशालच्या अकाली मृत्यू मुळे ग्रामस्थांतून हळहळ व्यक्त केली जात आहे.