राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या मुलाखती उत्साहात संपन्न
कोल्हापूर (प्रतिनिधी) - राष्ट्रवादी कार्यालय शिवाजी स्टेडियम कोल्हापूर येथे जिल्हा अध्यक्ष व्ही.बी.पाटील, शहराध्यक्ष आर.के. पोवार, राष्ट्रीय सचिव बाजीराव खाडे महिला शहराध्यक्ष पद्मजा तिवले जिल्हा कार्याध्यक्ष ॲड. अनिल घाटगे यांच्या प्रमुख उपस्थितीत इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती उत्साहात पार पडल्या.

इंडिया आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार हा एक घटक आहे. त्यामुळे इंडिया आघाडी प्रमुख आ. सतेज उर्फ बंटी डी. पाटील यांच्याकडे यापूर्वीच 21 जागांची मागणी करण्यात आली आहे. प्रत्येक प्रभागात एक उमेदवार राष्ट्रवादी शरद पवार गटाला पाहिजे अशी आमची पहिल्यापासूनची आग्रही भूमिका आहे त्या अनुषंगाने आज पक्ष कार्यालयात मुलाखती पार पडल्या.
सर्व मुलाखती झालेल्या उमेदवारांची यादी ही प्रदेश कार्यालयाकडे पाठवण्यात येणार असून त्याच पद्धतीने महाविकास आघाडी कडे देखील सदरची यादी पाठवण्यात येईल. येत्या दोन दिवसात कोल्हापूर जिल्हा इंडिया आघाडीतील सर्व प्रमुख घटकांची एकत्रित बैठक संपन्न होईल त्या बैठकीमध्ये अंतिम चर्चा होईल.
पक्षाकडे जवळपास 67 उमेदवारांनी मागणी केली आहे. त्यापैकी 39 मुलाखती आज रोजी पार पडल्या. सर्वांनीच पक्षाबरोबर पक्षाचा आदेश आम्ही मान्य करू असे मुलाखती दरम्यान सांगितले आहे. उच्च उच्चविद्याभूशीत प्राध्यापक, डॉक्टर, वकील, इंजिनियर, अशा लोकांनी आज मुलाखती दिल्या आहेत याचा अर्थ लोकशाही प्रक्रियेला शिक्षणाची जोड मिळेल असे वाटते.
मुलाखत दिलेल्या उमेदवारांची यादी -
प्रा. डॉ. लक्ष्मण करपे, प्रशांत पाटील, लता अरुण जोंधळे, मकरंद जोंधळे, राजवर्धन यादव, सोहेल बागवान, शिवानी बाजीराव खाडे, सुरेखा रामराजे बदाल, रामराजे बदाले, धनश्री गणेश जाधव, गणेश जाधव, रियाज कागदी, हिदायत मनेर, फिरोज सरगूर,सादिक अत्तार, पद्मजा तीवले मा. नगरसेविका, चंद्रकांत सूर्यवंशी, सोनू चौगुले, किसन कल्याणकर, रमेश पोवार मा. नगरसेवक, निलोफर बागवान, अकबर महात, हिदायत मणेर, दिशा निरंजन कदम इंजिनियर, हाजी वहिदा साजिद खान उस्ताद, सायरा आयुब नंदीकुरळे, ॲड. अनिल घाटगे, गणेश नलवडे, सारिका अवधूत पाटील, नागेश नारायण जाधव, मृणालिनी गणेश जाधव, बबलू दयावान चौगुले, रंजीता नारायण चौगुले, निरंजन कदम, तुषार महादेव गुरव, दिनकर लक्ष्मण कांबळे, डॉ.रूपाली अमोल बावडेकर, प्रा. हर्षल हरिदास धायगुडे. आज एकूण 39 इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती पार पडल्या.
या व्यतिरिक्त अजूनही अर्ज केलेले उमेदवार बाहेर असल्यामुळे 16 जणांच्या मुलाखती अजूनही घेणे बाकी आहे. त्या उद्या संपवण्यात येतील.
लवकरच महाविकास आघाडी इंडिया आघाडी बरोबर बैठक होऊन निर्णय होईल असे शेवटी जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील व शहराध्यक्ष आर. के. पोवार यांनी सांगितले.




