कागलमध्ये ज्वेलरी मेकिंग कार्यशाळेस महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

कागलमध्ये ज्वेलरी मेकिंग कार्यशाळेस महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

कागल (प्रतिनिधी) - कागल येथे राजमाता जिजाऊ महिला समितीमार्फत आयोजित ज्वेलरी मेकिंग कार्यशाळेस महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या कार्यशाळेत सव्वाशेहून अधिक महिलांनी भाग घेतला. महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र यांच्या मार्गदर्शनाखाली रोटरी ई - व्हाॕल्व्ह कोल्हापूर, राजे विक्रमसिंह घाटगे फाउंडेशन व राजमाता जिजाऊ महिला समिती यांच्या संयुक्त विद्यमाने या तीन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन केले होते. कागल येथील श्रीराम मंदिरमध्ये ही कार्यशाळा झाली.

टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ तसेच कपड्यांपासून तयार करायच्या दागिन्यांचे प्रशिक्षण व प्रात्यक्षिक प्रशिक्षिका मोनिका पाटील यांनी प्रशिक्षणार्थी महिलांना दिले. याबाबतचे साहित्य उपलब्ध करण्यासाह विक्री कौशल्याबाबत त्यांनी महिलांना माहिती दिली. उद्योजकता केंद्राचे शशिकांत लावंड यांनी महिलांनी तयार केलेल्या वस्तूंच्या मार्केटिंगबाबत मार्गदर्शन केले. तर जयकुमार निंबाळकर यांनी महिलांसाठीच्या विविध अनुदानाच्या योजना व बँकांकडील सवलतीच्या दरातील कर्ज योजनांबाबत माहिती दिली. प्रकल्प अधिकारी वनिता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या शिबिराच्या आयोजन केले होते.

प्रशिक्षणार्थी महिलांच्यावतीने श्वेता मगदूम, विजयश्री निंबाळकर, आरती म्हातूगडे, ज्योती खोत, अश्विनी बाबर, श्वेता मगदूम, स्मिता भिलवडीकर,सुमन पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी राजमाता जिजाऊ महिला समितीच्या कार्याध्यक्षा व राजे बँकेच्या अध्यक्षा नवोदिता घाटगे, रोटरीच्या अध्यक्षा मयुरा पंजवानी, उपाध्यक्षा श्वेता गांधी, श्रद्धा राठोड - शहा यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.