"व्हिजनरी छत्रपती संभाजी महाराज" या विषयावर १४ मे रोजी व्याख्यान

"व्हिजनरी छत्रपती संभाजी महाराज" या विषयावर १४ मे रोजी व्याख्यान

कोल्हापूर - स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड, कोल्हापूरच्या वतीने बुधवार 14 मे रोजी "व्हिजनरी छत्रपती संभाजी महाराज" या विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी 5 वाजता गोविंदराव टेंबे (एसी) सभागृह, देवल क्लब, खासबाग मैदान शेजारी, कोल्हापूर येथे हा कार्यक्रम पार पडणार आहे.

या कार्यक्रमात शिवचरित्र अभ्यासक नामदेवराव जाधव (लेखक – शिवाजी द मॅनेजमेंट गुरु) यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. ते छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्यापेक्षा अधिक त्यांच्या दूरदृष्टी, नेतृत्वशैली, भाषाज्ञान, अभ्यास आणि समाजहितासाठी घेतलेल्या निर्णयांची प्रेरणादायी बाजू समजावून सांगणार आहेत. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर उपस्थित राहणार आहेत.

शिवचरित्र अभ्यासक जाधव व्याख्यानातून पुढील मुद्द्यांवर मार्गदर्शन करणार - 

- नेतृत्वातील स्पष्टता

- शिक्षणाचे खरे महत्त्व

- समाजासाठी भूमिका घेण्याची गरज

- जबाबदारीची जाणीव आणि कृतीशीलता

या कार्यक्रमाविषयी बोलताना स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष रुपेश पाटील यांनी सांगितले, "छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास हा केवळ गौरवशाली नाही, तर तो आजच्या तरुणांसाठी विचारांचा आणि कर्तव्याचा मार्गदर्शक आहे. या व्याख्यानातून तरुणांनी प्रेरणा घेऊन आपले व्यक्तिमत्त्व व सामाजिक भूमिका घडवावी, हीच आमची अपेक्षा असल्याचही जिल्हाध्यक्ष रुपेश पाटील म्हणाले.