समाजकारण, राजकारणातील माझी मोठी ओळख संजयबाबा घाटगे यांच्यामुळेच - धनराज घाटगे

समाजकारण, राजकारणातील माझी मोठी ओळख संजयबाबा घाटगे यांच्यामुळेच - धनराज घाटगे

कोल्हापूर (प्रतिनिधी) -  माझ्या 29 वर्षाच्या सामाजिक व राजकीय वाटचालीत खऱ्या अर्थानं मोठ योगदान दिल आहे ते म्हणजे आमचे नेते माजी आमदार संजयबाबा घाटगे. माझ्या प्रत्येक जडणघडणी मध्ये त्यांचं मला खूप मोठ मार्गदर्शन मिळाल आहे. समाजकारण आणि राजकारणात माझी स्वतःची "मोठी ओळख" निर्माण होण्यास संजयबाबा घाटगे हेच "सर्वस्वी" आहेत. अशी प्रतिक्रिया संजय गांधी निराधार समिती कागलचे माजी अध्यक्ष धनराज घाटगे यांनी माझा महाराष्ट्र न्यूजशी बोलताना व्यक्त केली.

१९९५ ते २०२४ अशी २९ वर्ष माझा सामाजिक व राजकीय प्रवास आज पर्यंत मी करत आलो आहे. माझे वडील (आबा) जुन्या घाटगे गटाचे शिलेदार. २५ वर्ष ग्रामपंचायत मध्ये त्यांनी अभिराज्य गाजवल. त्यांच्या नंतर गावकऱ्यांच्या कृपने मला ग्रामपंचायत मध्ये १० वर्ष काम करण्याची संधी मिळाली. या कालावधी मध्ये राजे - बाबा असे दोन गट निर्माण झाले म्हणजे घाटगे गटाचे विभाजन. या मध्ये आमच्या घरातील वडीलधाऱ्यांशी चर्चा झाल्या नंतर संजयबाबां सोबत प्रवास करायचा निर्णय झाला याचे कारण म्हणजे बाबांनी आम्हाला विश्वासात घेतल होत.

संजयबाबांनी मला युवक काँग्रेस अध्यक्ष म्हणून रुजू होण्याची संधी दिली, या संधीचे सोन करत मी अनेक मंत्री, खासदार, आमदार यांच्याशी गाठी - भेटी करत स्वतःची ओळख निर्माण केली. तरुण असल्यामुळे इच्छाशक्तीच्या जोरावर समाजकारण आणि राजकारणात फक्त बाबा म्हणून वाटचाल करायची असा विचार घेऊन पुढे गेलो.      

बाबांचा विश्वासू सहकारी म्हणून अनेक नेते लोक देखील मला मान सन्मान देऊ लागले, काँग्रेसच्या नेत्याकडून विकास निधी गावासाठी ओढून आणला. यामध्ये पाणी पुरवठा, रस्ते, गट्री ,ग्रामपंचायत, पाण्याची टाकी , मंदिरे, , सांस्कृतिक हॉल , महिलांसाठी व्यवसाय , शिकलेल्या मुलांना शासकीय नोकऱ्या, शेतकऱ्यांना आवजारे, पुन्हा माझ्या सोबत काम करणाऱ्या मित्रांना ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद मध्ये निवडून दिले अशी अनेक सामाजिक सेवा माझ्या हातून पार पडल्या. 

यामध्ये अनेक चढ - उतार येत होते, अडचणी येत होत्या पण माझ्या सोबत काही अश्या गोष्टी पाठीशी असायच्या ज्यांनी मला कधीच माघार घेऊ दिली नाही. पहिली म्हणजे बजरंग बलीची कृपा अन् आई वडीलांचा आशीर्वाद आणि दुसरी म्हणजे आदरणीय संजयबाबा यांचं प्रेम आणि मार्गदर्शन. मला माझ्या आयुष्यात आई वडील यांच्या नंतर जर कोणी भरभरून प्रेम केल असेल तर ते बाबांनीच...!! 

माझ्या सारख्या तरुणाला एक मोठी ओळख निर्माण करून दिली. मिनी आमदारकी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संजय गांधी निराधार चे अध्यक्ष पदाची माळ बाबांनीच माझ्या गळ्यात टाकली. खरेतर या अध्यक्ष पदाचे दावेदार अंबरीशदादा होते पण स्वतःच्या मुलग्यावर वर जे प्रेम होते तेच बाबांनी आम्हाला दिले. 

आज अनेक जण विचारतात की बाबांकडे सत्ता नसताना तुम्ही काय म्हणून सोबत आहे. त्या सर्वांना नम्रपणे माझे एकच उत्तर आहे बाबांकडे सत्ता असली काय आणि नसली काय बाबांची ओळख आणि ताकद ही एकाद्या मंत्र्या प्रमाणेच आहे. हे कागल तालुक्यासह जिल्ह्याने पाहिल आहे. आज राजकारणात माझी जरी मोठी ओळख निर्माण झाली असली तरी संजयबाबा घाटगे या नावामुळे आहे आणि ती ओळख या नावाशिवाय पूर्ण होणे शक्य नाही.  

मी काल काय झाल आणि उद्या काय होणार याचा कधी विचार केला नाही पण राजकारणात जोपर्यंत आहे तोपर्यंत फक्त "बाबा" हीच माझी ओळख. आज जे काय मला राजकारणात स्थान आहे यासाठी मी बाबांचा मनपूर्वक आभारी आहे. असे उत्तुंग व्यक्तिमत्व असलेले आमचे नेते संजयबाबा घाटगे यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!