अनेक वर्षे प्रलंबित सर्किट बेंचच्या ऐतिहासिक निर्णयाबद्दल भाजपाचा आनंदोत्सव

कोल्हापूर (प्रतिनिधी) - मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापुरात येत्या 18 ऑगस्टला सुरू होत असून कोल्हापूर जिल्ह्याची चाळीस वर्षांची मागणी पूर्ण झाली आहे. या ऐतिहासिक निर्णयाबद्दल भारतीय जनता पार्टी कोल्हापूरच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
आज छत्रपती शिवाजी महाराज चौकात भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी एकत्रित येत ढोल ताशाच्या गजरात ठेका धरत, साखर पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला. भारतीय जनता पार्टीचा विजय असो, देवेंद्रजी तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है, चंद्रकांतदादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.
यावेळी बोलताना प्रदेश सचिव महेश जाधव म्हणाले, राज्यातील महायुती सरकार विकासाभिमुख असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली घेतलेला हा निर्णय कोल्हापूरच्या दृष्टीने अभिमानास्पद आहे. या धाडसी निर्णयातून राज्यातील सक्षम आणि विकासाभिमुख सरकारची भूमिका स्पष्ट होत आहे. या ऐतिहासिक निर्णयामुळे कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सहा जिल्ह्यांतील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
यावेळी बोलताना खासदार धनंजय महाडिक म्हणाले, मागील ४० ते ५० वर्षापासून असणारी खंडपीठाची मागणी पूर्ण होऊन लोक लढ्याला यश आले आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापूरला दिलेला शब्द पाळला हे यावेळी अधोरेखित करावे लागेल. सर्वप्रथम या ऐतिहासिक निर्ण्याबाद्द्ल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री अजित पवार, राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या रेट्याने हा प्रश्न मार्गी लागला याबद्दल त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन. लोकलढा, नेते मंडळींची एकत्रित भूमिका यांच्या ताकदीबरोबर राज्यसरकारच्या इच्छाशक्तीमुळेच असे महत्वपूर्ण निर्णय होत आहेत. या निर्णयामुळे राज्यभरातून कोल्हापूरला येणारा ओढा वाढणार असून कोल्हापूरच्या विकासाला चालना मिळणार असून जिल्ह्यात १० ते १५ शासकीय ऑफिस नव्याने निर्माण होणार आहेत. या सर्वांच्या सोबत जिल्हा बार असोसिएशनचे विशेष अभिनंदन कारण ज्यांनी हा प्रश्न चिकाटीने लावून धरला आणि पूर्णत्वास नेला.
यावेळी ॲड. संपतराव पवार यांनी या महत्वपूर्ण निर्णयाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री अजित पवार, राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचे मनपूर्वक अभिनंदन केले.
यावेळी डॉक्टर राजवर्धन, गायत्री राऊत, हेमंत आराध्ये, अप्पा लाड़, विराज चिखलीकर, शैलेश पाटील, राजू मोरे, गणेश देसाई, धनश्री तोड़कर, भरत क़ाळे, संतोष भिवटे, विजय सूर्यवंशी, अतुल चव्हाण, तौफ़ीक़ बागवान, दिग्विजय कालेकर, अमर साठे, राजसिंह शेलके, धीरज पाटील, विशाल शिरालकर, रविकिरण गवली, कोमल देसाई, प्रीतम यादव, सुनील पाटील, राजगणेश पोळ, गिरीश साळोखे, अनिल कामत, संतोष माळी, माणिक पाटील चुयेकर, प्रसाद जाधव, विजय खाड़े-पाटील, प्रग्नेश हमलाई, हर्षद कुंभोजकर, अशोक लोहार, सतीश अंबरडेकर, अॅड.परवेज पठान, अॅड.संगीता तांबे, अमित पसारे, संजय जासूद, विशाल शिराळे, नरेंद्र पाटील, दिलीप बोंदे, राजू जाधव, योगेश ओटवकर, अवधूत भाट्ये, रिमा पालनकर, संग्रामसिंह निकम, सुनीता सूर्यवंशी, जयश्री वायचळ, समयश्री अय्यर, छाया साळुंखे, शोभा कोळी, तेजस्विनी पार्टे, माधुरी कुलकर्णी, अश्विनी गोपूडगे, सचिन आवळे, अजित सूर्यवंशी, विजय आगरवाल, धीरज करलकर, अमित शिंदे, सचिन पोवार, सरिता हारुगले, विश्वास पोवार, किशोर लाड, संग्राम जरग, विश्वास जाधव, पुष्पक पाटील, अमेय भालकर, मनोज इंगळे, सुशांत पाटील, राहुल घाटगे, अनिल कोळेकर, अनिल पाटील, प्रशांत अवघडे, राहुल सोनटक्के, अमर भालकर, रणजीत औंधकर, मानसिंग पाटील, संजय सावंत यांच्यासह भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.