नाम.चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते भाजपा आयोजित घरगुती गणपती आरास सजावट स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ उत्साहात संपन्न
कोल्हापूर (प्रतिनिधी) - भारतीय जनता पार्टीच्या कोल्हापूर वतीने गणेशोत्सव 2025 चे औचित्य साधून कोल्हापूर शहरातील नागरिकांसाठी गणपती आरास सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला शहरातील अनेक नागरिकांनी उस्फूर्त सहभाग नोंदवला यामध्ये जवळपास पंधराशे लोकांनी ऑनलाइन नोंदणीच्या माध्यमातून सहभाग नोंदवला. कोल्हापुरातील ज्वलंत प्रश्नांची उदाहरणे देणारे अनेक देखावे यानिमित्ताने स्पर्धकांनी केले होते यामध्ये खंडपीठ, ऑपरेशन सिंदूर, माधुरी हत्ती, ग्रामीण जीवन पद्धती यासारखे अनेक देखावे लक्षवेधी ठरले. कोल्हापूर जिल्हा दौरावर असलेले उच्च व तंत्र शिक्षण मंत्री नाम. चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते भाजपा जिल्हा कार्यालयात या स्पर्धकांना बक्षिसांचे वितरण करण्यात आले.

प्रथम क्रमांक युद्धवीर इंद्रजीत माने राहणार शिवाजी पेठ कोल्हापूर यांच्या घरगुती देखाव्याला देण्यात आला त्यांना बक्षीस म्हणून अडीच ग्रामचे सोन्याचे नाणे, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन त्यांना गौरवण्यात आले. क्रमांक दोनच्या ओंकार महादेव पाटील यांच्या देखाव्यास दोन ग्रॅम चे सोन्याचे नाणे सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले तर क्रमांक तीनच्या योगीराज राजेंद्र साखरे विजेत्यासाठी दीड ग्रॅम सोन्याचे नाणे सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला. त्याचबरोबर स्पर्धेत भाग घेतलेल्यांना विशेष दखल म्हणून 100 उत्तेजनार्थ स्पर्धकांना आकर्षक ऐरावत मूर्ती बक्षीस देण्यात आली.
याप्रसंगी बोलताना नाम. चंद्रकांत पाटील म्हणाले, भारतीय जनता पार्टी म्हणजे निवडणूक असाच अजेंडा नसून सर्वसामान्य लोकांसाठी, माणसांवर प्रेम करून त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणारी पार्टी आहे. गणोशोत्सव हा आनंदोत्सव व्हावा म्हणून या स्पर्धेचे आयोजन केले होते. आपल्यातील कलाकार जिवंत ठेवण्यासाठी लोकांनी दिलेला उदंड प्रतिसाद भारावून टाकणार आहे. पुढील वर्षी अशा स्पर्धा मोठ्या प्रमाणात घेण्याचा माणस याप्रसंगी दादांनी व्यक्त केला.
स्पर्धेचे नियोजन गायत्री राउत यांच्यासह अमर साठे व भाजपा मंडल अध्यक्ष धीरज पाटील, विशाल शिराळकर, रविकिरण गवळी, कोमल देसाई, सुनील पाटील, राजगणेश पोळ, प्रीतम यादव, विनय खोपडे यांनी पाहिले.
याप्रसंगी नाम.चंद्रकांतदादा पाटील, प्र.का.सदस्य महेश जाधव, जिल्हाध्यक्ष विजय जाधव, नाथाजी पाटील, राहूल चिकोडे, संजय बाबा घाटगे, विराज चिखलीकर, हेमंत आराध्ये, राजू मोरे, माधुरी नकाते, गणेश देसाई, धनश्री तोडकर, विश्वजित पोवार यांच्यासह भाजपा पदाधिकारी व स्पर्धक मोठ्या संख्येने उपस्थित होते.




