अर्थखातं पुन्हा NCPकडे कधी जाणार? जय पवार यांची मोठी अपडेट

अर्थखातं पुन्हा NCPकडे कधी जाणार? जय पवार यांची मोठी अपडेट

मुंबई (प्रतिनिधी) : अजित पवार यांच्या अनुपस्थितीनंतर राज्याच्या अर्थखात्याची जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःकडे ठेवली होती. अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर हे खाते पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसकडे (NCP) जाण्याची चर्चा सुरू होती, मात्र अद्याप यावर अंतिम निर्णय झालेला नाही.

या पार्श्वभूमीवर बारामतीतील एका कार्यक्रमात बोलताना जय पवार यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. त्यांनी सांगितलं की, विकासकामं रखडली आहेत असं म्हटलं जात असलं तरी प्रत्यक्षात तसं नाही. दादांच्या अनुपस्थितीनंतर अर्थसंकल्पाची तातडी असल्यामुळेच मुख्यमंत्री फडणवीस यांनी अर्थखातं स्वतःकडे ठेवलं होतं.

जय पवार पुढे म्हणाले की, काही दिवसांपूर्वी पार्थ पवार, सुनेत्रा पवार आणि इतर कुटुंबीयांची मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा झाली आहे. त्या चर्चेत लवकरच अर्थखातं पुन्हा NCPकडे देण्याबाबत सकारात्मक संकेत मिळाल्याचं त्यांनी सांगितलं.

“दादांचं विकासाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मीही त्यांच्यासारखं काम करण्याचा प्रयत्न करेन आणि सर्वांपर्यंत पोहोचेन,” असंही जय पवार यांनी स्पष्ट केलं.