कसबा बीड येथील महिला महाविद्यालयात राष्ट्रीय ग्रंथपाल दिन साजरा

करवीर (विश्वनाथ मोरे) - सद्गुरू शिक्षण संस्था संचलित महिला महाविद्यालय कसबा बीड ( ता. करवीर ) येथील यशवंत ग्रंथालयात राष्ट्रीय ग्रंथपाल दिन साजरा करण्यात आला.
प्रारंभी महिला महाविद्यालयाचे प्राचार्य एन.एम.पाटील व कल्लेश्वर ज्यु. कॉलेजचे प्राचार्य डी. के. भोपळे यांच्या हस्ते ग्रंथालयशास्त्राचे जनक एस.आर.रंगनाथन यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी प्राचार्य एन.एम.पाटील व डी.के.भोपळे यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांनी कॉलेजच्या समृद्ध वाचनालयाचा लाभ घ्यावा असे आवाहन केले. ग्रंथपाल प्रा. प्रियांका कासोटे यांनी रंगनाथन यांच्या कार्याचा आढावा घेतला. स्वागत व प्रास्ताविक सहा.प्रा.वाय.एस.पाटील यांनी केले तर आभार सहा. प्रा. उमेश कांबळे यांनी मानले.
याप्रसंगी महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.