राजकीय वर्तुळात खळबळ! राज ठाकरे एकनाथ शिंदेंच्या घरी

राजकीय वर्तुळात खळबळ! राज ठाकरे एकनाथ शिंदेंच्या घरी

मुंबई (प्रतिनिधी) : मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. ठाण्यातील नंदनवन बंगल्यावर एकनाथ शिंदेंची भेट घेतली. राज ठाकरे आणि एकनाथ शिंदेंच्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

राज्यात नुकत्याच महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्या. या निवडणुकीनंतर पहिल्यांदाच राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची आज (18 फेब्रुवारी) भेट झाली. यावेळी एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंमध्ये विविध विषयांवर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. मात्र दोघांच्या भेटीमागील नेमकं अधिकृत कारण समोर आलेलं नाही. 

राज ठाकरे आणि एकनाथ शिंदेंच्या भेटीवर शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी एका माध्यम शी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे. एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांची एक भेट झाली. त्यावर येवढं मोठं काही करायची गरज नाही. एकनाथ शिंदे आमचे विरोधी नेते जरी असले तरी ते राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. तसेच राज ठाकरे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख आहेत. त्यामुळे राज ठाकरेंनी कोणाला भेटायला जावं, जाऊ नये, यावर आम्ही काही बोलू शकत नाही. राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली, यामध्ये आक्षेपार्ह असं काहीच नाही. एका पक्षाचे प्रमुख राज्याच्या उपमुख्यमंत्र्याना भेटतात, यामध्ये नक्कीच काहीतरी कारणं असू शकतात, असंही सुषमा अंधारेंनी सांगितले.