राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान २०२६ अंतर्गत प्रबोधन व सांगता समारंभ

राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान २०२६ अंतर्गत प्रबोधन व सांगता समारंभ

कोल्हापूर (प्रतिनिधी):कोल्हापूर शहर वाहतुक नियंत्रण शाखेकडून राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान दिनांक ०१/०१/२०२६ ते दिनांक -३१/०१/२०२६ पर्यंत मा. पोलीस अधीक्षक श्री. योगेश कुमार गुप्ता, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. बी. धीरजकुमार, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती प्रिया पाटील यांचे मार्गदर्शनाखाली वाहतुक अभियान राबविण्यात आले. त्या अनुषंगाने मा. जिल्हाधिकारी कार्यालय येथुन वाहतुक शाखा कोल्हापूर यांचे करवी दिनांक ०१/०१/२०२६ रोजी शहरातुन रॅलीचे नियोजन करुन वाहतुक नियमा बाबत वाहनधारकांनी वाहन चालविताना हेल्मेट परीधान करणे बाबत प्रबोधनात्मक घोषणा देवुन नागरीक व वाहनधारकांचे प्रबोधन केले. तसेच मोबाईल व्हॅन वरील स्पीकर व मेगाफोन द्वारे वाहतुक नियमांबाबत प्रबोधन करणेत आलेले आहे. शहरातील विविध शाळांना भेटी देवुन विदयार्थ्यांमध्ये प्रबोधन केले आहे. राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान २०२६ अंतर्गत ट्रॅफिक पोलीस गार्डन येथे विविध शाळातील सुमारे १७०० विदयार्थी-विदयार्थिनी यांना वाहतुक नियमा विषयी, सिग्नल व्यवस्थे बाबत मार्गदर्शन केले आहे.

पोलीस अधिकारी व अंमलदार यांचेकरीता नेत्र व आरोग्य शिबीर आयोजीत करुन त्यामध्ये पोलीस अधिकारी व अंमलदार यांची वैदयकीय तपासणी करुन घेतलेली आहे. वाहतुक शाखेकडील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी रक्तदान शिबीरामध्ये भाग घेतला आहे.

दिनांक ०१/०१/२०२६ ते ३१/०१/२०२६ या कालावधीत नागरीक व वाहनधारकांमध्ये वाहतुक नियमाविषयी प्रबोधन करण्याबरोबर वाहतूक नियमांचे उल्लंघन करणारे वाहनधारकांवर मोटार वाहन कायदयान्वये खालील प्रमाणे केसेस करुन दंडात्मक कारवाई करणेत आलेली आहे.

चालु वर्षी सन २०२५ मध्ये ३८ अपघाताने घट झालेली आहे. अपघात घटना टाळण्यासाठी कोल्हापूर शहरामधील व जिल्हयातील ब्लॅक स्पॉट पाहणी करून सदर ठिकाणी कायमस्वरुपी व तात्पुरत्या स्वरुपातील उपाययोजना करण्यासाठी कोल्हाया कालावधीमध्ये धैर्यप्रसाद हॉल येथे "राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान" अंतर्गत वाहतुक सप्ताह सांगता समारंभ पार पडला. सदर सांगता समारंभास विशेष निमंत्रित श्रीमती प्रिया पाटील, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग, श्री. संतोष डोके, पोलीस निरीक्षक शाहुपूरी पोलीस ठाणे, श्री. किरण लोंढे, पोलीस निरीक्षक जुनाराजवाडा पोलीस ठाणे, श्री. दिपक जाधव, सहा. पोलीस निरीक्षक, शहर वाहतूक शाखा, नागेश मात्रे, सहा. पोलीस निरीक्षक, शहर वाहतूक नियंत्रण शाखा, व शहरातील व ग्रामिण भागातील शाळांचे शिक्षक-विदयार्थी, पालक तसेच श्री. श्रीकांत मोरे, आर.एस.पी. चे समादेशक व विदयार्थी उपस्थित होते.

रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत कोल्हापूर शहर व ग्रामीण भागामधील शाळामध्ये चित्रकला, निबंध व घोष वाक्य स्पर्धा घेण्यात आलेल्या होत्या. चित्रकला, निबंध व घोषवाक्य स्पर्धेमधील विजेते मुले व मुलीना मा. उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग तसेच इतर मान्यवरांचे हस्ते प्रशस्तिपत्र व ट्रॉफी देवून त्यांचा सत्कार करण्यात आला.

रस्ता सुरक्षा अभियानामध्ये उल्लेखनीय काम करणारे पोलीस अंमलदार तसेच शाळेचे विद्यार्थी, पालक तसेच कार्यक्रमाचे सुत्रसंचालक यांना देखील मान्यवरांचे हस्ते प्रशिस्तपत्रक व ट्रॉफी देवून गौरव करण्यात आलेला आहे. रस्ता सुरक्ष अभियान सांगता समारंभास कार्यक्रमास उपस्थित असले विदयार्थी, पालक यांना मान्यवरांनी वाहतुक नियमांबाबत तसेच अपघात टाळण्यासाठी सडक सुरक्षेचे महत्व याबाबत प्रबोधन केले. सदर सांगता संमारंभाचे प्रास्ताविक शहर वाहतुक नियंत्रण शाखा प्रभारी पो.नि.श्री. नंदकुमार मोरे यांनी केले व उपस्थितांचे आभार सहायक पोलीस निरीक्षक श्री. नागेश मात्रे यांनी मानले आहे.

रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत वाहतुक सप्ताह संपन्न झालेला आहे तरी कोल्हापूर शहर वाहतुक नियंत्रण शाखेकडून या पुढे ही विविध वाहतुक नियमानुसार जास्तीत जास्त विशेष कारवाईची मोहीम राबविण्यात येणार असुन नियमांचा भंग करुन वाहन चालविणारे वाहनचालकांमुळे होणारे अपघाताचे प्रमाण अत्यल्प करण्याचा मानस आहे. तरी वाहतुक नियमांचे पालन करुन नागरीकांनी सहकार्य करावे.