उल्लेखनीय काम केलेल्या 54 अधिकारी - कर्मचाऱ्यांचा महापालिकेच्या वतीने सत्कार

उल्लेखनीय काम केलेल्या 54 अधिकारी - कर्मचाऱ्यांचा महापालिकेच्या वतीने सत्कार

कोल्हापूर (प्रतिनिधी) - महापालिकेच्या 53 व्या वर्धापन दिनानिमित्त महापालिकेत उल्लेखनीय काम केलेल्या 54 अधिकारी व कर्मचाऱ्यांचा प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. हा कार्यक्रम महापालिकेच्या कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे चौकात घेण्यात आला.

यामध्ये अग्निशमन विभागाकडील अधिकारी व जवान, अधिक्षक, सहा.अधिक्षक, वरिष्ठ लिपीक, कनिष्ठ लिपिक, शिपाई, कामगार, पहारेकरी, प्रभारी इन्चार्ज सिस्टर, वॉर्डबॉय, झाडू कामगार, मिटर रिडर, हेल्पर अशा 54 जणांचा सत्कार प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, शिल्पा दरेकर, उप - आयुक्त परितोष कंकाळ, किरणकुमार धनवाडे, सहा.आयुक्त उज्वला शिंदे, स्वाती दुधाणे, कृष्णा पाटील, मुख्य लेखा व वित्त अधिकारी राजश्री पाटील, शहर अभिंयता रमेश मस्कर, जल अभियंता हर्षजीत घाटगे, मुख्य लेखापाल संजय सरनाईक, प्रशासन अधिकारी डी.सी.कुंभार, नगरसचिव सुनील बिद्रे, करनिर्धारक व संग्राहक सुधाकर चलावाड, उपशहर रचनाकार एन.एस.पाटील, उपशहर अभियंता महादेव फुलारी, सुरेश पाटील, अरुण गुजर, निवास पोवार, इस्टेट ऑफिसर विलास साळोखे, कामगार अधिकारी राम काटकर, पर्यावरण अधिकारी समीर व्याघ्राबरे, मुख्य आरोग्य निरिक्षक जयवंत पवार, रचना व कार्यपध्दती अधिकारी प्रशांत पंडत, मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे, महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.