कात्रज घाटात वॉर्डबॉयवर गोळीबार

पुणे : कात्रज घाटात फलटण शासकीय रुग्णालयात काम करणाऱ्या वॉर्डबॉयवर गोळीबार झाला. दीपक लोकर असे जखमी वॉर्डबॉयचे नाव आहे. दीपकच्या छातीत गोळी अडकली आहे.
कात्रज घाटामध्ये दोघा जणांनी दीपक लोकर याच्यावर फायरिंग केल्याचा आरोप आहे. यामध्ये दीपक लोकर गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर भारती हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. दीपक हा फलटण शासकीय रुग्णालयात डेड हाऊस या ठिकाणी वॉर्ड बाय म्हणून काम करतो. दीपक याला दारुचे व्यसन असल्याचं सांगितलं जातं. सुट्टी असल्यामुळे तो बाहेर फिरायला गेला होता.
दीपक कात्रज घाटाच्या दिशेने गेला. यावेळी दोघांनी त्याला वाटेत थांबवलं. त्याच्या दिशेने दोन गोळ्या झाडल्या. दीपक याच्या छातीमध्ये गोळी अडकली असून घटनास्थळावर पिस्टल पोलिसांना मिळाली आहे. आरोपींची ओळख अद्याप पटू शकलेली नाही.