कोल्हापूरच्या 'क्युअरलाइफ कॅन्सर सेंटर'ला 'प्राइड ऑफ भारत' पुरस्कार

कोल्हापूरच्या 'क्युअरलाइफ कॅन्सर सेंटर'ला 'प्राइड ऑफ भारत' पुरस्कार

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कॅन्सरचे उपचार सर्वसामान्यांपर्यंत परवडणाऱ्या आणि सुलभ पद्धतीने पोहोचविण्यासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत, कोल्हापूर येथील 'क्युअरलाइफ कॅन्सर सेंटर'ला 'प्राइड ऑफ भारत अवॉर्ड्स अँड समिट २०२६' मध्ये ‘आउटस्टँडिंग कॉन्ट्रिब्युशन टू अफोर्डेबल अँड ॲक्सेसिबल कॅन्सर केअर २०२६’ या मानाच्या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

मुंबईतील हॉटेल हॉलिडे इन येथे आयोजित करण्यात आलेल्या या विशेष सोहळ्यात प्रसिद्ध अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे यांच्या हस्ते हा पुरस्कार क्युअरलाइफ कॅन्सर सेंटर चे प्रमुख डॉक्टर अक्षय शिवछंद यांना प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन 'इनसाइट सक्सेस मीडिया' प्रस्तुत 'इनसाइट एक्सलन्स अवॉर्ड्स' यांच्या सहकार्याने करण्यात आले होते.

पुरस्कार स्वीकारल्यानंतर मनोगत व्यक्त करताना क्युअरलाइफ कॅन्सर सेंटरच्या प्रतिनिधींनी सांगितले की, "हा पुरस्कार केवळ आमच्या संस्थेचा सन्मान नसून, कोल्हापूरसह संपूर्ण महाराष्ट्रातील रुग्णांना दर्जेदार, परवडणारी आणि सुलभ कॅन्सर सेवा उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही करत असलेल्या प्रयत्नांची ही पोहोचपावती आहे."

कॅन्सरचे गंभीर निदान झाल्यानंतर रुग्णांना उपचारांसाठी मुंबई-पुण्यासारख्या मोठ्या शहरांकडे धाव घ्यावी लागू नये, तसेच अत्याधुनिक कॅन्सर उपचार स्थानिक पातळीवरच उपलब्ध व्हावेत, या उद्देशाने हे केंद्र सातत्याने कार्यरत आहे.

"हा पुरस्कार आमच्यासाठी केवळ एक सन्मान नसून अधिक मोठ्या जबाबदारीची सुरुवात आहे. कोल्हापूर आणि परिसरातील अधिकाधिक रुग्णांपर्यंत गुणवत्तापूर्ण कॅन्सर उपचार पोहोचविण्याचा आमचा संकल्प यापुढेही असाच कायम राहील," असा विश्वास या वेळी क्युअरलाइफ कॅन्सर सेंटरतर्फे व्यक्त करण्यात आला.