शिव आरोग्य सेना गावागावात पोहचली पाहिजे: उपनेते संजय पवार
सर्किट हाऊस कोल्हापूर येथे शिव आरोग्य सेनेची जिल्हास्तरीय आढावा बैठक संपन्न
कोल्हापूर/प्रतिनिधी: हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या '८०% समाजकारण आणि २०% राजकारण' या तत्त्वानुसार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या आदेशाने तसेच शिव आरोग्य सेना राज्य कार्याध्यक्ष किशोर ठाणेकर यांच्या सूचनेनुसार कोल्हापूरच्या सर्किट हाऊस येथे शिव आरोग्य सेना जिल्हा पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.

आरोग्य सेवेचा विस्तार:
जिल्ह्यातील गरजू रुग्णांना वैद्यकीय मदत मिळवून देणे आणि आरोग्य क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या 'आरोग्य दूतांना' सर्वतोपरी सहकार्य करण्याचा निर्धार या वेळी व्यक्त करण्यात आला.
गावागावात संघटन:
शिवसेना पक्षवाढीसाठी आणि शिव आरोग्य सेनेचे कार्य कोल्हापूर जिल्ह्याच्या प्रत्येक गावागावात आणि घराघरात पोहचवण्याचा संकल्प बैठकीत करण्यात आला.
आढावा व नवीन निवडी:
बैठकीत मागील वर्षातील आरोग्य सेनेच्या कार्याचा सविस्तर आढावा घेण्यात आला, तसेच संघटनेच्या बळकटीकरणासाठी काही नवीन पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या.
शिवसेना उपनेते संजय पवार यांनी बैठकीत आपले मनोगत व्यक्त केले. या प्रसंगी जिल्हाप्रमुख विराज पाटील, जिल्हाप्रमुख संजय चौगले, नगरसेवक सुनील मोदी, शहरप्रमुख विशाल देवकुळे आणि उपशहर प्रमुख राहुल माळी यांची प्रमुख उपस्थिती होती.
या बैठकीस शिव आरोग्य सेनेचे पश्चिम महाराष्ट्र प्रमुख डॉ. उत्तम माळी, जिल्हाध्यक्ष डॉ. संतोष पाटील, ग्रामीण जिल्हाध्यक्ष डॉ. दिग्विजय पाटील, सचिव डॉ. किरण पवार, जिल्हा समन्वयक ओंकार (विकी) मोहिते, सचिव गोविंद वाघमारे, डॉ. राजेंद्र महाडिक (राधानगरी), डॉ. संदीप पाटील, डॉ. अजित पाटील (गगनबावडा), डॉ. रमेश सूर्यवंशी (कागल), डॉ. के. एम. पाटील, डॉ. पूजा टाकमारे, शहर समन्वयक रितेश पाटील, सचिव साताप्पा शिंगे, उपजिल्हा संघटक ज्ञानेश्वर शिरावडेकर यांच्यासह तालुका समन्वयक दयानंद भोपळे (आजरा), संतोष माजगावकर (पन्हाळा), निलेश म्हेतर (गगनबावडा), विजय रणदिवे (कागल) आणि मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.




