अशोकराव माने ग्रुपमध्ये भारताचा ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात संपन्न

अशोकराव माने ग्रुपमध्ये भारताचा ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात संपन्न

                                            निवृत्त नाईक संग्राम जाधव यांच्या हस्ते ध्वजारोहण

पेठवडगाव:अशोकराव माने ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्सच्या इंजिनिअरिंग महाविद्यालय प्रांगणात भारताचा ८० वा स्वातंत्र्यदिन अत्यंत देशभक्तीपूर्ण आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या सोहळ्यात भारतीय सैन्यातील ५६ फील्ड रेजिमेंट (JITRA), आर्टिलरीमधील निवृत्त नाईक संग्राम बाळासो जाधव यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

 

कार्यक्रमादरम्यान संग्राम जाधव यांनी आपल्या सेवा काळातील सियाचीन ग्लेशियर, पुंछ (जम्मू-काश्मीर), भूतान, सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश यांसारख्या दुर्गम व संवेदनशील भागांतील थरारक अनुभव उपस्थितांसमोर मांडले. "देशसेवेसाठी प्रत्येकाने सैन्यातच भरती झाले पाहिजे असे नाही; तर आपण ज्या क्षेत्रात कार्यरत आहोत, तेथे प्रामाणिकपणे व जबाबदारीने काम करणे हीदेखील मोठी राष्ट्रसेवाच आहे," असा प्रेरणादायी संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.

या प्रसंगी कॅम्पस डायरेक्टर डॉ. प्रवीण घेवारी, संचालक प्रा. डॉ. संगीता चौगुले, पॉलिव्हॅल्यू/पॉलिटेक्निकचे प्राचार्य डॉ. युवराज गुरव, नर्सिंगचे प्राचार्य प्रसाद फुटाणे आणि अश्विनी कारंडे यांच्यासह सर्व विभागांचे डीन, विभागप्रमुख, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ध्वजारोहणानंतर विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांची मन जिंकली.