कोल्हापूर जिल्हा परिषदेत ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात; अध्यक्षा शिल्पाताई खोत यांच्या हस्ते ध्वजारोहण
कोल्हापूर (प्रतिनिधी): भारताच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त कोल्हापूर जिल्हा परिषद मुख्यालयात मुख्य ध्वजारोहण सोहळा अत्यंत उत्साहात आणि देशभक्तीपूर्ण वातावरणात पार पडला. जिल्हा परिषद अध्यक्षा शिल्पाताई खोत यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

ध्वजारोहण सोहळ्यानंतर उपस्थितांनी राष्ट्रगीत गायन केले, तसेच 'भारत माता की जय'च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. यावेळी स्वातंत्र्यासाठी प्राणांचे बलिदान देणाऱ्या तमाम वीर हुतात्म्यांना आणि देशाच्या सीमेवर अहोरात्र रक्षण करणाऱ्या जवानांना भावपूर्ण अभिवादन करण्यात आले.
या सोहळ्यास जिल्हा परिषद उपाध्यक्ष तानाजी पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जस्मिन, शिक्षण सभापती शीतल यादव, जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र सूर्यवंशी, स्नेहल वेल्हाळ, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जोशी यांच्यासह सर्व विभागांचे प्रमुख, अधिकारी, कर्मचारी आणि जिल्हा परिषद कलामंचाचे कलाकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.




