कोल्हापूर अकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्सतर्फे वार्षिक शैक्षणिक परिषदेचे आयोजन- डॉ. विजय गावडे

कोल्हापूर अकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्सतर्फे वार्षिक शैक्षणिक परिषदेचे आयोजन- डॉ. विजय गावडे

कोल्हापूर (प्रतिनिधी): कोल्हापूर अकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्सतर्फे वार्षिक शैक्षणिक परिषदेचे आयोजन केले असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर विजय गावडे यांनी दिली.13 व 14 जून या कालावधीत हॉटेल सयाजी येथे ही परिषद होणार आहे. परिषदेत बालरोग चिकित्सा विषयातील बदलते प्रवाह, नवीन संशोधन, अधुनिक उपचार पद्धती या विषयावर सखोल चर्चा होणार आहे.

कोलकाता येथील बालरोग पोट विकार तज्ज्ञ डॉ. उज्ज्वल पोद्दार, हैदराबादचे अतिदक्षता तज्ज्ञ डॉ. फरहान शेख, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभागाच्या बालरोग तज्ज्ञ डॉ. पल्लवी सापळे आदी बालरोग तज्ज्ञांचे विविध विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. लहान मुलांतील रोग निदान व आधुनिक उपचाराची माहिती बालरोग तज्ज्ञांना दिली जाणार आहे. संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. विजय गावडे, सचिव डॉ. मिलिंद सदावर्ते, सहसचिव डॉ. भूषण मिरजे, डॉ. रूचिका यादव परिषदेसाठी परिश्रम घेत आहेत.