प्राथमिक शिक्षक बँकेच्या अध्यक्षापदी वर्षा केनवडे तर उपाध्यक्षापदी पद्मजा मेढे यांची निवड
कोल्हापूर (प्रतिनिधी) : दि प्राथमिक शिक्षक सहकारी बँक लि; कोल्हापूर या बँकेची संचालक मंडळाची सभा शनिवार दिनांक १४/०२/२०२६ इ. रोजी बँकेच्या सभागृहात अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीकरिता मा. युसुफ अ. शेखसो, सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था अधिन जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, कोल्हापूर अध्यासी अधिकारी यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाली.

या सभेमध्ये अध्यक्षा पदी वर्षा शरद केनवडे, तालुका करवीर यांचे नांव नंदकुमार तुकाराम वाईंगडे यांनी सुचविले तर त्यास गजानन सखाराम कांबळे यांनी अनुमोदन दिले. उपाध्यक्षा पदी पद्मजा तानाजी मेढे, तालुका करवीर यांचे नांव अर्जुन दिनकर पाटील यांनी सुचविले व त्यास श्री. रामदास शामराव झेंडे यांनी अनुमोदन दिले.
अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी अन्य कोणाचीही नामनिर्देशन प्रत्रिका नसलेने अध्यासी अधिकारी मा.युसुफ अ. शेखसो यांनी वर्षा शरद केनवडे यांची अध्यक्षा पदी तर पद्मजा तानाजी मेढे यांची उपाध्यक्षापदी बिनविरोध निवड झालेचे जाहीर केले.
सत्काराला उत्तर देताना नूतन अध्यक्षा वर्षा शरद केनवडे यांनी बँकेचे संचालक व सुकाणू समितीचे सर्व पदाधिकारी यांचे आभार मानले व त्यांना धन्यवाद दिले. या संधीचा मी बँकच्या प्रगतीसाठी व सभासदांच्या उन्नतीसाठी प्रयत्न करीन. अध्यक्षपदाच्या कालावधीमध्ये बँकेचा कारभार पारदर्शी होण्यासाठी आणि बँकेचा व्यवसाय व ठेवींमध्ये वाढ होण्यासाठी आपले प्रयत्न राहतील. वचननाम्याच्या पूर्ततेसाठी सकारात्मक उर्जा घेऊन सभासदांच्या आर्थिक उन्नतीचा विचार घेऊनच संचालक मंडळ काम करील. सभासदांच्या अडचणी समजावून घेवून त्या सोडविण्यासाठी आपला प्रयत्न राहील.
सदर सभेस संचालक सर्वश्री बाळकृष्ण हळदकर, बाळासाहेब निंबाळकर, राजेंद्रकुमार पाटील, सुनिल एडके, अर्जुन पाटील, शिवाजी रोडे-पाटील, सुरेश कोळी, एस.व्ही. पाटील, नंदकुमार वाईंगडे, अमर वरुटे, शिवाजी बोलके, गजानन कांबळे, रामदास झेंडे, गौतम वर्धन तसेच सुकाणू समितीचे सर्वश्री जोतीराम पाटील, रविकुमार पाटील, सुनिल पाटील, विलास चौगुले, प्रमोद तौंदकर, रघुनाथ खोत, संजय कुडूकर, राज्यनेते उद्यजी शिंदे, महासचिव राजन कोरगांवकर, उपाध्यक्ष राजनजी सावंत, दादा जांभवडेकर, विविध संघटनाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सरचिटणीस, जिल्ह्यातील शिक्षक पतसंस्थाचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक, श्री शाहू आघाडीचे सन्माननीय सभासद तसेच बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संजयकुमार मगदूम उपस्थित होते.




