पॉवर लिफ्टिंग व वेटलिफ्टिंग प्रशिक्षण केंद्राचा लाभ घेण्याचे आवाहन - विद्या शिरस

कोल्हापूर (प्रतिनिधी) - जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अंतर्गत पॉवर लिफ्टिंग व वेटलिफ्टिंग प्रशिक्षण केंद्र छत्रपती शिवाजी स्टेडीयम मंगळवार पेठ व शहाजी महाविद्यालय येथे जून 2025 पासून सुरु करण्यात आले आहे. प्रशिक्षण केंद्रामध्ये क्रीडा विकास अधिकारी अंजिंक्य वसंत चौगले, क्रीडा कार्यकारी अधिकारी सोनल सावंत यांच्या मार्गदशनाखाली प्रशिक्षण केंद्र सुरु करण्यात आले असून जिल्ह्यातील इच्छुक खेळाडुंनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस यांनी केले आहे.
प्रशिक्षण केंद्र सकाळी 6.30 ते 11 व सायंकाळी 4 ते 7 या सत्रात सुरु राहील. प्रशिक्षण केंद्र संदर्भात अधिक माहितीसाठी कार्यालयीन वेळेत क्रीडा विकास अधिकारी अंजिंक्य चौगले यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.