प्रेयसीला टाकून तिच्याच मैत्रिणीसोबत पळून लग्न, पुण्यात धक्कादायक प्रकार

पुणे: पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ओंकार उत्तम प्रधान (वय 22, मूळ कोल्हापूर) या तरुणाने मुंबईतील तरुणीशी लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवले, तिच्या गर्भपाताची वेळ आणली आणि नंतर तिला सोडून दिलं. धक्कादायक बाब म्हणजे, ओंकारने तिच्याच मैत्रिणीसोबत पळून जाऊन लग्न केलं, ज्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
पीडित तरुणीने कोडोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी ओंकारला ताब्यात घेतलं आहे. ओंकारने पुण्यातील नोकरीदरम्यान मुंबईतील तरुणीशी सोशल मीडियावरून ओळख वाढवली होती. हडपसर, पन्हाळा अशा ठिकाणी नेत तिला लग्नाचे आश्वासन देत शारीरिक संबंध ठेवले. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.