भाजपची विधानपरिषद निवड: दिल्लीचा अंतिम निर्णय अद्याप गुप्त, ‘सरप्राईज’ची शक्यता कायम
मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्रात विधानपरिषदेच्या 10 जागांसाठी निवडणूक पार पडणार आहे. दहा पैकी ६ जागा भाजपच्या वाट्याला जाणार आहेत. महाराष्ट्र भाजपकडून विधान परिषदेच्या जागांसाठी यादी दिल्लीच्या नेतृत्वाला पाठवण्यात आली आहे. केंद्रीय नेतृत्वाला भाजपकडून ३० जणांची यादी पाठवण्यात आली आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी संघटनेत काम करणाऱ्या आणि नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे, तर विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी प्रज्ञा सातव यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब झाल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. विधान परिषदेच्या 9 जागांपैकी भाजपच्या वाट्याला 5 जागा येणार आहेत. भाजपकडून 5 नावांसाठी 30 जणांची यादी केंद्रीय नेतृत्वाला सोपवण्यात आली आहे. तर दिलेल्या नावांपैकी कोणाला संधी मिळतेच असे नाही, यामध्ये वेगळे नाव दिल्लीतून दिली जाऊ शकतात अशी चर्चा आहे.

भाजपच्या प्रदेश कोअर कमिटीने जी नावे दिल्लीला पाठविली त्यापेक्षा वेगळेच नाव दिल्लीहून दिले जाऊ शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे कोअर कमिटीने दिलेल्या नावांमधूनच सहा नावे येतील याची शाश्वती नाही. मात्र, सहापैकी तीन नावे ही प्रदेशाने सुचविलेल्यांतून असू शकतील, असंही बोललं जात आहे.
माधवी नाईक, डॉ. उपेंद्र कोठेकर, मनोज कोटक, केशव उपाध्ये, रवी अनासपुरे, राजेश पांडे, दयाशंकर तिवारी, राम सातपुते, रणजितसिंह निंबाळकर, संजय काका पाटील, विवेक कोल्हे, जगदीश मुळीक, प्रमोद जठार, संजय केणेकर, अर्चना पाटील चाकूरकर, दादाराव केचे, संजय भेंडे, संदीप जोशी अशी नावं यादीत असल्याची सूत्रांची माहिती आहे.




