भिवंडी इमारत दुर्घटना: कोणतीही परवानगी न घेता ठेकेदार करत होता दुरुस्ती; मंत्री गिरीश महाजन यांची मोठी माहिती!

भिवंडी इमारत दुर्घटना: कोणतीही परवानगी न घेता ठेकेदार करत होता दुरुस्ती; मंत्री गिरीश महाजन यांची मोठी माहिती!

भिवंडी: ठाण्यातील भिवंडीत गुरुवारी (३० जुलै) मध्यरात्री एक चार मजली इमारत पत्त्याच्या महलासारखी कोसळून मोठी भीषण दुर्घटना घडली. या दुर्घटनेत आतापर्यंत जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी माहिती समोर आली आहे. आज शुक्रवारी (३१ जुलै) देखील घटनास्थळी युद्धपातळीवर बचावकार्य सुरू असून, ढिगाऱ्याखाली अजूनही काही जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

या घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफच्या (NDRF) जवानांनी तातडीने धाव घेत बचावकार्य सुरू केले असून, स्थानिक प्रशासन आणि नागरिकही यात मदत करत आहेत. दरम्यान, आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी स्वतः घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला असून, या संपूर्ण दुर्घटनेबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. तसेच मृतांच्या नातेवाईकांना एनडीआरएफच्या निकषानुसार योग्य ती मदत दिली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

विनापरवानगी सुरू होते इमारतीचे काम

भिवंडीतील नारपोली भागातील गंगाराम वाडी परिसरातील कोहिनूर नावाची चार मजली इमारत अचानक कोसळली. घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर मंत्री गिरीश महाजन यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, "ही इमारत २००७-०८ मध्ये बांधण्यात आली होती, म्हणजेच तिला फार वर्ष झालेली नव्हती. प्रशासनाकडून यापूर्वीच ही इमारत धोकादायक असल्याचा इशारा देत ती खाली करण्याची नोटीस येथील रहिवाशांना देण्यात आली होती. सुदैवाने, या इमारतीत राहणारी जवळपास ३० कुटुंबे आधीच बाहेर काढण्यात आली होती. मात्र, काल रात्री जेव्हा ही इमारत कोसळली, तेव्हा तिथे दुरुस्तीचे काम सुरू होते."

ठेकेदाराच्या चुकीमुळे दुर्घटना

मंत्री महाजन यांनी पुढे माहिती दिली की, घटनास्थळी कॉलम आणि कामाचे साहित्य दिसून येत असून, ठेकेदार तिथे काम करत होता. परंतु, इमारतीची दुरुस्ती करण्यापूर्वी महापालिकेची कायदेशीर परवानगी घेणे बंधनकारक असते, मात्र ठेकेदाराने कोणतीही परवानगी घेतलेली नव्हती. ठेकेदाराच्या याच चुकीमुळे आणि विनापरवानगी सुरू असलेल्या कामामुळे ही दुर्घटना घडल्याचे प्राथमिक तपासात समोर येत आहे. या अपघातात काही कामगार आणि एका कुटुंबातील काही सदस्य ढिगाऱ्याखाली अडकले, दुर्दैवाने यामध्ये जणांचा मृत्यू झाला.

धोकादायक 'बी विंग' तातडीने पाडण्याचे निर्देश

या दुर्घटनेत इमारतीची 'बी विंग' पूर्णपणे कोसळली असून, तिची जुनी ' विंग' देखील अत्यंत धोकादायक स्थितीत आहे. त्यामुळे उर्वरित इमारत पूर्णपणे रिकामी करण्यात आली आहे. भविष्यात कोणतीही अनर्थ टाळण्यासाठी ही कमकुवत आणि धोकादायक इमारत तातडीने पाडण्याचे कठोर निर्देश देण्यात आल्याचे गिरीश महाजन यांनी सांगितले. रात्रीपासूनच बचाव पथकाने अहोरात्र प्रयत्न करून लोकांना वाचवण्याचे प्रयत्न केले, मात्र नऊ जणांचा जीव वाचवण्यात अपयश आले. प्रशासनाकडून आता उर्वरित धोकादायक संरचना पाडण्याचे काम वेगाने सुरू आहे.