रस्त्यावर कचरा टाकणाऱ्या नागरिकाने भरला 'इतक्या' रूपयांचा दंड

रस्त्यावर कचरा टाकणाऱ्या नागरिकाने भरला 'इतक्या' रूपयांचा दंड

कोल्हापूर (प्रतिनिधी) - कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीने काल हॉकी स्टेडियम ते विश्व पंढरी रोडपर्यंत स्वच्छता मोहिम राबवण्यात आली होती. मात्र, या मोहिमेनंतरही स्वच्छ झालेल्या रस्त्यावर एका नागरिकाने कचरा टाकण्याचा प्रकार घडला. ही कृती करत असताना आरोग्य निरीक्षक अनिकेत सूर्यवंशी यांनी त्या नागरिकाला रंगेहात पकडले.

दंड भरण्यास नागरिकाने सुरुवातीला नकार दिला. त्यामुळे सूर्यवंशी यांनी त्याला जुना राजवाडा पोलीस ठाण्यात नेले आणि गुन्हा दाखल करणार असं सांगितलं.  यानंतर नागरिकाने स्वच्छ ठिकाणी कचरा फेकल्याबद्दल ६०० रुपयांचा दंड भरला.