विरोधाचे दगड आणि कामाचं कवच: मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीसांची उद्योजकांसोबत दिलखुलास फटकेबाजी
नागपूर: नागपूरमधील बुट्टीबोरी औद्योगिक वसाहतीतील 'आवाडा ग्रुप' कॅम्पसमध्ये आयोजित विशेष कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या वैयक्तिक आयुष्यापासून ते राजकीय प्रवासावर अत्यंत दिलखुलास भाष्य केले. प्रशासकीय आव्हाने, राजकीय सहकार्य, कुटुंबाचे पाठबळ आणि विरोधकांच्या टीकेला उत्तर देण्याची स्वतःची खास शैली, या सर्व मुद्द्यांवर त्यांनी मनमोकळा संवाद साधला.

माझी चाल नव्हे, तर प्रेरणा कासवाची
टीकाकारांना उत्तरे कशी देता, या प्रश्नावर बोलताना त्यांनी एका खास शैलीत स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले, "माझी चाल कासवासारखी मंद नसली, तरी माझी प्रेरणा नक्कीच कासव आहे. जेव्हा जेव्हा विरोधक माझ्यावर टीका करतात किंवा दगड फेकतात, तेव्हा मी कासवाप्रमाणे स्वतःच्या शेलमध्ये (कवचात) जातो. त्यांच्या निरर्थक टीकेकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून मी केवळ माझ्या कामावर लक्ष केंद्रित करतो."
समृद्धी महामार्गाचा मार्ग आणि विरोधकांचे आव्हान
महायुतीतील समन्वय आणि योजनांच्या यशावर बोलताना त्यांनी समृद्धी महामार्गाचे उदाहरण दिले.
सहकाऱ्यांची साथ व विरोधकांचा रोष:
"जेव्हा मी समृद्धी महामार्ग उभारण्याचा निर्णय घेतला, तेव्हा महायुतीतील सहकाऱ्यांनी मला खंबीर साथ दिली. मात्र, शरद पवार आणि तत्कालीन महायुतीचा भाग असूनही उद्धव ठाकरे यांनी या प्रकल्पाला तीव्र विरोध केला होता."
विक्रमी जमीन अधिग्रहित:
सर्व विरोधांवर मात करत सरकारने अवघ्या एका वर्षात जमिनीचे संपादन पूर्ण केले.तोंडघशी पडलेले विरोधक:
"आज ज्या लोकांनी या प्रकल्पाला विरोध केला होता, तेच या समृद्धी महामार्गाचे कौतुक करत आहेत. आमच्या ध्येयनिष्ठेमुळेच आज विरोधकांची तोंडे बंद झाली आहेत," असे फडणवीस म्हणाले.
कुटुंब, मित्र आणि वास्तववादी अभिप्राय
आपल्या यशामध्ये कुटुंब आणि मित्रांचा मोठा वाटा असल्याचे सांगताना ते म्हणाले की, उच्च पदावर गेल्यानंतर अनेकदा लोक स्वतःबद्दलच्या चुका ऐकून घेण्याची तयारी दाखवत नाहीत. परंतु,
घरातील ऊर्जेचा स्त्रोत:
पत्नी आणि मुलगी त्यांना सतत काम करण्याची नवी ऊर्जा देतात.
मित्रांचे वास्तववादी कानउघाडणी:
"नागपुरात माझ्या मित्रांसाठी मी मुख्यमंत्री नाही. माझे मित्र आणि कुटुंबीय मला माझ्या चुका थेट दाखवून देतात आणि मीदेखील लोकांचे वास्तववादी फीडबॅक ऐकण्यास नेहमी तयार असतो."
राजकारणातील खाचखळगे आणि टीका-टिपणीला बाजूला सारून विकासाच्या मार्गावर कसे ठाम राहायचे, याचे उत्तम उदाहरण फडणवीस यांनी या संवादातून मांडले.




