शरद इंजिनिअरिंगच्या ५ विद्यार्थ्यांची टाटा मोटर्समध्ये निवड
यड्राव : यड्राव येथील शरद इन्स्टिट्युट ऑफ टेक्ऩॉलॉजी, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधील ५ विद्यार्थ्यांची टाटा मोटर्स या आंतरराष्ट्रीय नामांकित कंपनीत निवड झाली. महाविद्यालयातील मेकॅनिकल इंजिनिअरिंग व मेकॅट्रॉनिक्स इंजिनिअरिंग विभागातील विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.

यामध्ये मेकॅनिकलच्या आयुष कोळी, स्वरुपा मगदूम, रजत मधाळे तर मेकॅट्रॉनिक्सच्या आदर्श माणगांवे, तरल पाटील या विद्यार्थ्यांची निवड झाली.
टाटा मोटर्स लिमिटेड ही टाटा समूहाची प्रमुख वाहन उत्पादक कंपनी असून जगातील आघाडीच्या ऑटोमोबाईल कंपन्यांपैकी एक आहे. १९४५ मध्ये स्थापन झालेल्या या कंपनीत जगभरात ९० हजारांहून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत. प्रवासी वाहने, व्यावसायिक वाहने, इलेक्ट्रिक वाहने तसेच जग्वार लँड रोव्हर या लक्झरी ब्रँडच्या माध्यमातून टाटा मोटर्सची १२५ हून अधिक देशांमध्ये उपस्थिती असून भारतीय वाहन उद्योगात कंपनीचे महत्त्वपूर्ण योगदान आहे.
महाविद्यालयात राबविण्यात येणाऱ्या 'शरद पॅटर्न'अंतर्गत उद्योगाभिमुख शिक्षण, कौशल्यविकास आणि प्लेसमेंट-केंद्रित प्रशिक्षणाला विशेष प्राधान्य दिले जाते. त्यामध्ये स्पेशल अॅप्टीट्युड ट्रेनिंग, टेक्ऩिकल स्कीलचे वेगळे प्रशिक्षण तसेच मॉक इंटरव्ह्यु यासह टेक्निकल सेशन, व्हॅल्यू अॅडेड प्रोग्रॅम, कंपनी स्पेसीपीक ट्रेनिंग, अद्यावत तंत्रज्ञानाबाबत कंपनीतील व इंडस्ट्री क्षेत्रातील तंज्ञामार्फत मार्गदर्शन यासह विविध उपक्रम राबविले जातात. शेवटच्या वर्षी सहा महिने इंडस्ट्री इंटर्नशिप असते. या सर्वाचा उपयोग विद्यार्थ्यांना या कॅम्पससाठी झाला.
निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे संस्थेचे चेअरमन आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर, एक्झिक्युटीव्ह डायरेक्टर अनिल बागणे यांनी अभिनंदन केले.




