श्रद्धा अकॅडमीची ९ वी ते १२ वी फोर इयर प्रोग्रॅम प्रवेश परीक्षा ३ मे रोजी इचलकरंजीत

श्रद्धा अकॅडमीची ९ वी ते १२ वी फोर इयर प्रोग्रॅम प्रवेश परीक्षा ३ मे रोजी इचलकरंजीत

इचलकरंजी (प्रतिनिधी) : श्रद्धा इन्स्टिट्यूट ऑफ करिअर डेव्हलपमेंटतर्फे राबविण्यात येणाऱ्या 'श्रद्धा ९ वी ते १२ वी फोर इयर प्रोग्रॅम'च्या प्रवेशासाठीची एन्ट्रन्स परीक्षा रविवार, ३ मे रोजी घेण्यात येणार आहे. ही परीक्षा श्रद्धा इन्स्टिट्यूट, रिक्रिएशन हॉलजवळ, गांधी पुतळा, इचलकरंजी येथे होणार असून विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.

श्रद्धा इन्स्टिट्यूट ऑफ करिअर डेव्हलपमेंटने ९ वीपासून १२ वीपर्यंतचा चार वर्षांचा विशेष अभ्यासक्रम सुरू केला आहे. राष्ट्रीय स्तरावर घेतल्या जाणाऱ्या 'नीट' व 'जेईई' या स्पर्धा परीक्षांची तयारी दहावीनंतर सुरू केल्यास अनेक विद्यार्थ्यांना अभ्यासाचा ताण जाणवतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी ९ वी पासूनच नियोजनबद्ध आणि टप्प्याटप्प्याने तयारी केल्यास स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवणे सोपे होते.

या चार वर्षांच्या प्रोग्रॅममध्ये जेईई अॅडव्हान्स व नीट परीक्षेची सखोल तयारी, दहावी व बारावीच्या बोर्ड परीक्षांच्या अनुषंगाने सर्व विषयांचा अभ्यास, भरपूर सराव यावर भर दिला जातो. अनुभवी व उच्चशिक्षित शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांची तार्किक विचारशक्ती, आकलन क्षमता, विश्लेषण कौशल्य, वेळेचे नियोजन विकसित करण्यासाठी प्रशिक्षण दिले जाते.

या प्रोग्रॅमसाठी प्रवेश प्रक्रिया निवड चाचणीच्या माध्यमातून केली जाते. श्रद्धा इन्स्टिट्यूटकडून २०० गुणांची प्रवेश चाचणी परीक्षा घेण्यात येते. दरवर्षी साधारणपणे ऑक्टोबर ते मार्चदरम्यान नोंदणी प्रक्रिया सुरू असते. महाराष्ट्रातील विविध भागांतून या चाचणीसाठी मोठा प्रतिसाद मिळत आहे. सुमारे २ हजार ते ३ हजार विद्यार्थी या परीक्षेसाठी नोंदणी करतात. परीक्षेनंतर दोन ते तीन दिवसांत निकाल जाहीर केला जातो व गुणवत्तेनुसार मर्यादित विद्यार्थ्यांची निवड केली जाते. 

या प्रोग्रॅमच्या २०२५ मधील पहिल्याच बॅचने उल्लेखनीय यश संपादन केले आहे. अथर्व हावळ याला एम्स दिल्ली, निधी कासट हिला एम्स भुवनेश्वर येथे प्रवेश मिळाला. आदित्य कनोजे याने आयआयटी बॉम्बे, शर्विल घोळसे याने आयआयटी दिल्ली तर वासुदेव राज याने आयआयटी मद्रास येथे प्रवेश मिळवत संस्थेच्या प्रोग्रॅमची गुणवत्ता सिद्ध केली. याशिवाय अनेक विद्यार्थ्यांनी देशातील विविध नामांकित मेडिकल व इंजिनिअरिंग महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळवला आहे. त्यामुळे इन्स्टिट्यूटच्या फोर इयर प्रोग्रॅमला पालक व विद्यार्थ्यांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. यंदाच्या वर्षीची प्रवेश परीक्षा रविवार, ३ मे रोजी होणार असून इच्छुक विद्यार्थ्यांनी या परीक्षेला उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.