महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गुणीजनांचा सत्कार

महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गुणीजनांचा सत्कार

कोल्हापूर प्रतिनिधी): कोल्हापूर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या गुणीजनांचा महापौर रुपाराणी निकम यांच्या हस्ते गौरवचिन्ह देवून सत्कार करण्यात आला.

यावेळी गौरी सचिन चौगले (वैद्यकिय क्षेत्रातील एम.बी.बी.एस.परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल), पृथ्वीराज प्रविण सोनवणे (सी.बी.एस.ई.पॅटर्न इयत्ता 10 वी शालान्त परिक्षेमध्ये 98.20 टक्के प्राप्त करुन उल्लेखनीय यश संपादन केलेबद्दल), तेज नरेंद्र पाटील (स्केटिंग खेळामध्ये चांगल्या खेळाचे प्रदर्शन करुन राष्ट्रीय स्तरापर्यंत यश प्राप्त केले. तसेच आंतरराष्ट्रीय (इंडोनेशिया) स्केटिंग स्पर्धेसाठी निवड झाली असून नॉनस्टॉप स्केटिंग स्पर्धेसाठी निवड झालेबद्दल), जिजा प्रसाद फराकटे (वयाच्या चौथ्या वर्षी स्केटिंग खेळामध्ये चांगल्या खेळाचे प्रदर्शन करुन राष्ट्रीय स्तरापर्यंत यश प्राप्त केले. तसेच आंतरराष्ट्रीय (इंडोनेशिया) स्केटिंग स्पर्धेसाठी निवड झाली असून नॉनस्टॉप स्केटिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तसेच पाच रेकॉर्ड तिच्या नावावर असलेबद्दल), स्मिता विक्रम सावंत (राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेमध्ये चांगल्या खेळाचे प्रदर्शन करुन 67 व्या राष्ट्रीय नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धा नवी दिल्ली 2026 मध्ये डबल ट्रप ज्युनिअर व सिनिअर महिला संघात 2 सुवर्ण पदके जिंकली. तसेच 16 व्या आंतरराष्ट्रीय आशियाई नेमबाजी स्पर्धा कजाकस्तान 2025 मध्ये ज्युनिअर महिला संघाने डबल ट्रॅप मध्ये रौप्य पदक जिंकले, अखिल भारतीय आंतर विद्यापीठ क्रीडा स्पर्धेमध्ये कास्य पदक मिळवून यश संपादन केल्याबद्दल) व अथर्व जोशी (सी.बी.एस.ई.पॅटर्न इयत्ता 10 वी शालान्त परिक्षेमध्ये 99 टक्के प्राप्त करुन उल्लेखनीय यश संपादन केलेबद्दल) या सर्वांचा महापौर रुपाराणी निकम यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला.

    यावेळी उपमहापौर अक्षय जरग, स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, महिला व बालकल्याण समिती सभापती कौसर बागवान, सभागृह नेता मुरलीधर जाधव, विरोधी पक्षनेता राजेश लाटकर, अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, गटनेते इंद्रजित बोंद्रे, शारंगधर देशमुख, नगरसेवक प्रवीण सोनवणे, अभिजीत मोकाशी,आदिल फरास, प्रतिज्ञा उत्तुरे, नगरसचिव सुनील बिद्रे, नगरसेवक,नगरसेविका व अधिकारी उपस्थित होते.