करिअरच्या सुवर्णसंधी! डी. वाय. पाटीलच्या एआयएमएलच्या ६८ विद्यार्थ्यांना प्लेसमेंट ऑफर्स
कोल्हापूर : डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, कसबा बावडा येथील आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग (एआयएमएल) विभागाच्या विद्यार्थ्यांनी प्लेसमेंटमध्ये उल्लेखनीय यश संपादन केले आहे. विभागातील गुणवंत विद्यार्थ्यांना २९ हून अधिक नामांकित कंपन्यांकडून तब्बल ६८ प्लेसमेंट ऑफर्स मिळाल्या आहेत. यात 'मोव्हेट' कंपनीने विद्यार्थिनी सना मुजावर हिला ९ लाख रुपयांचे वार्षिक सर्वोच्च पॅकेज दिले आहे.

महाविद्यालयात राबवण्यात आलेल्या विविध प्लेसमेंट ड्राईव्हद्वारे ही यशस्वी निवड झाली आहे. यामध्ये 'लॉन्च्ड ग्लोबल' कंपनीत सर्वाधिक १२ विद्यार्थ्यांची निवड झाली असून, इतर अग्रगण्य कंपन्यांमध्येही विद्यार्थ्यांनी बाजी मारली आहे:
-
एड्युव्हर्सिटी (बेंगळुरू): १० विद्यार्थी
-
अनलॉक्स अकॅडमी: ८ विद्यार्थी
-
इन्फोसिस: ६ विद्यार्थी
-
वॉलस्टार टेक्नॉलॉजीज: ४ विद्यार्थी
-
फॉक्सवॅगन प्रा. लि.: ३ विद्यार्थी
आकर्षक पॅकेजची वैशिष्ट्ये:
विद्यार्थ्यांना मिळालेल्या पॅकेजमध्ये 'मोव्हेट' (९ लाख), 'एचपी' (८.५ लाख), 'ग्लोलॉजिक्स सोल्युशन्स' (७.२ लाख), 'लॉन्च्ड ग्लोबल' (७ लाख), 'अनलॉक्स अकॅडमी' (६ लाख) आणि 'झंवर ग्रुप' (५.५ लाख) यांचा समावेश आहे. याशिवाय फॉक्स सोल्युशन्स, मायक्रोलाइज, डिलॉईट सायबर गुरुकुल प्रोग्राम आणि एक्सेलआर यांसारख्या कंपन्यांनीही विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी दिल्या आहेत.
प्रशिक्षणाचे महत्त्व:
उद्योगक्षेत्राच्या बदलत्या गरजांनुसार विद्यार्थ्यांना तांत्रिक प्रशिक्षण, एआय व मशीन लर्निंग कौशल्ये, कोडिंग प्रॅक्टिस, सॉफ्ट स्किल्स आणि मॉक इंटरव्ह्यूचे विशेष प्रशिक्षण दिले जाते. या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळेच विद्यार्थ्यांना उत्तम करिअरच्या संधी मिळत असल्याचे कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता यांनी सांगितले.
विशेष म्हणजे, महाविद्यालयास वॉशिंग्टन अकॉर्डच्या निकषांनुसार एनबीए मानांकन आणि शिवाजी विद्यापीठाकडून स्वायत्त संस्थेचा दर्जा प्राप्त आहे.
या यशात प्रा. सुदर्शन सुतार, प्रा. मकरंद काईंगडे, प्रा. डॉ. सिद्धेश्वर पाटील व सर्व प्लेसमेंट समन्वयक, प्राध्यापक व कर्मचाऱ्यांचे योगदान लाभले. या उज्ज्वल यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता, प्राचार्य डॉ. संतोष चेडे यांच्यासह सर्व आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.




