सभासदांचा विश्वास आणि सहकार्याच्या जोरावर पहिल्याच वर्षी ५ कोटींचा टप्पा गाठला : चेअरमन एकनाथ पाटील

सभासदांचा विश्वास आणि सहकार्याच्या जोरावर पहिल्याच वर्षी ५ कोटींचा टप्पा गाठला : चेअरमन एकनाथ   पाटील

 सांगरूळ फाटा येथे कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी पतसंस्थेची पहिली वार्षिक सभा उत्साहात संपन्न

करवीर/प्रतिनिधी :कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी पतसंस्था कोल्हापूर, शाखा सांगरूळ फाटा, कोपार्डे (ता. करवीर) या शाखेची पहिल्या वर्षाची वार्षिक सर्वसाधारण सभा अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. पहिल्याच वर्षी संस्थेने ५ कोटींची घोडदौड करत मोठी प्रगती साधली आहे.

 या सभेत संस्थेच्या पहिल्या वर्षाच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. तसेच सन २०२६-२७ मधील आक्षेपिक उत्पन्न, खर्च व नफा या विषयांवर चर्चा करून वार्षिक हिशोब पत्रकास सर्वानुमते मंजुरी देण्यात आली.

 कार्यक्रमाच्या प्रास्ताविक व स्वागतामध्ये संस्थेचे  चेअरमन एकनाथ चित्राप्पा पाटील यांनी संस्थेच्या प्रगतीचा आलेख मांडला. "सभासदांच्या विश्वासाच्या आणि सहकार्याच्या जोरावर पहिल्याच वर्षी ५ कोटींच्या व्यवसायाचा टप्पा गाठला असून, भविष्यात संस्थेचा अधिक विस्तार केला जाईल," अशी ग्वाही त्यांनी दिली.

 या प्रसंगी अहवाल वाचन मॅनेजर एस. के. लोहार (रा. वाकरे) यांनी केले, तर उपस्थितांचे आभार उपाध्यक्ष शिवाजी दिनकर आडनाईक यांनी मानले. या सभेला संस्थेचे पदाधिकारी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अध्यक्ष एकनाथ विश्वास पाटील (कुडित्रे), उपाध्यक्ष शिवाजी दिनकर आडनाईक (यवलूज), संचालक बुद्धीराज आनंदराव पाटील (महे )चेअरमन एकनाथ चित्राप्पा पाटील , बाळासो कृष्णात खाडे (सांगरूळ), सर्वेश सरदार पाटील (फुलेवाडी),सरदार शिवाजीराव पाटील (शिरोली दु.),कृष्णात दिनकर जांभळे (खुपिरे), प्रकाश बळवंत देशमुख (आसुर्ले),सागर शामराव पाटील (कोपार्डे),विजय बाबुराव भोसले (कांचनवाडी),संभाजी ज्ञानू वजाई (डिंगवडे), संभाजी सिन्नाप्पा नाईक (फुलेवाडी), भरत प्रकाश सरनोबत (आईदर), सागर शहाजी पाटील (आरळे), मोहन मारुती परीटकर (मोरेवाडी), संचालिका पूनम रणजित पाटील (विंचवडे),२. सुनिता अरुण पाटील (वाकरे) यांच्यासह सभासद उपस्थित होते.