*कागल नगरपालिका निवडणुकीसाठी इच्छुकांशी समरजितसिंह घाटगे यांनी साधला संवाद*
कागल, {प्रतिनिधी} - कागल नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी प्रभागनिहाय कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन मते जाणून घेतली.यावेळी नगरसेवकपदासाठी इच्छुकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून जोरदार शक्तीप्रदर्शन केले.अनेकांनी उमेदवारीसाठी घाटगे यांच्याकडे थेट मागणी केली.घाटगे यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना सांगितले की, “गटाच्या शिस्तीप्रमाणेच निर्णय घेतला जाईल. कोणत्याही परिस्थितीत कागल नगरपालिकेवर आपल्या विजयाचा झेंडा फडकला पाहिजे,यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज रहावे व सर्वांनी एकदिलाने कामाला लागावे.”

यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी देखील “राजे देतील तो निर्णय अंतिम” असे जाहीर करत, नगरपालिकेवर विजयाचा झेंडा फडकवण्यासाठी एकदिलाने प्रयत्न करण्याचा निर्धार व्यक्त केला.जुन्या कार्यकर्त्यांसह नव्या चेहऱ्यांचा या बैठकीत उत्साह ओसंडून वाहत होता.
*शंभरहून अधिक इच्छुक*
कागल नगरपालिकेची निवडणूक एकूण अकरा प्रभागांमध्ये होणार असून नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडला जाणार आहे.या वेळी नगराध्यक्ष पद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे.
या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष पदासह अकरा प्रभागातील उमेदवारीसाठी शंभरहून अधिक कार्यकर्त्यांनी राजे समरजितसिंह घाटगे यांच्याकडे मागणी केली.या सर्वांना घाटगे यांनी गटाच्या परंपरेप्रमाणे इच्छुकांनी उमेदवारी अर्ज मागणी करावेत.त्यानंतर सर्वांशी चर्चा करून उमेदवारी बाबत निर्णय घेतला जाईल,असे समरजितसिंह घाटगे यांनी स्पष्ट केले.




