अच्युत गोडबोले यांचे कोल्हापूरात व्याख्यान

कोल्हापूर (प्रतिनिधी) - श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस संचलित उचगांव येथील न्यू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नाॅलाॅजीमधील नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांसाठीच्या 'दीक्षारंभ' या कार्यक्रमात सुप्रसिद्ध उद्योजक, तंत्रज्ञ, लेखक, वक्ते अच्युत गोडबोले यांची प्रमुख पाहुणे उपस्थिती असणार आहे. गोडबोले हे विद्यार्थी, पालक, शिक्षक यांना संबोधित करणार आहेत.
शैक्षणिक व्यासपीठांवर कृत्रिम बुद्धिमत्ता व अनुषंगिक तंत्रज्ञान या विषयावर गोडबोले हे भाष्य करतात. सायबर संस्थेच्या आनंदभवन या सभागृहात हा कार्यक्रम बुधवार २० ऑगस्ट रोजी सकाळी १०.३० वाजता होणार आहे. कोल्हापूरातील शैक्षणिक व औद्योगिक क्षेत्रातील इच्छुकांनी या व्याख्यानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन एनआयटीचे प्राचार्य डाॅ. संजय दाभोळे यांनी केले आहे.