अस्तित्व टिकवण्यासाठी 'एआय' चे आव्हान स्वीकारावे लागेल - निपुण कोरे
कोल्हापूर (प्रतिनिधी) - नागरी सहकारी बँकांना कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) वापर आगामी काळात करावा लागणार असून, आपल्या अस्तित्वासाठी एक आव्हान म्हणून स्वीकारावे लागेल, असे प्रतिपादन कोल्हापूर जिल्हा नागरी बँक्स असोसिएशनचे अध्यक्ष निपुण कोरे यांनी केले. बँक्स असोसिएशनच्या ४६ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते.

असोसिएशनची सध्या असलेली जागा अपुरी पडत असल्याने नवीन जागा घेऊन अद्ययावत इमारत बांधण्यात यावी. यासाठी जागा खरेदीसह इमारत बांधकामाचे अधिकार संचालकांना देण्यात आले. असोसिएशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल नागराळे यांनी प्रास्ताविक केले. ज्योती हराळे,दीपक गाडवे, दत्तात्रय राऊत, राजीव रणदिवे यांचा सत्कार करण्यात आला. अॅड. शामरावजी शिंदे सत्यशोधक सहकारी बँकेच्या वतीने देण्यात येणारा 'अॅड. शामरावजी शिंदे सर्वोत्कृष्ट बँक' पुरस्कार यड्राव को-ऑप. बँकेला देण्यात आला. असोसिएशनचे उपाध्यक्ष विठ्ठल मोरे यांनी आभार मानले.
या बँकांचा केला गौरव -
कल्लाप्पाण्णा आवाडे बँक (५०१ कोटींपेक्षा अधिक ठेवी)
आप्पासाहेब पाटील बँक (२५१ ते ५०० कोटी ठेवी)
कुंभी कासारी बँक (१०१ ते २५० कोटी ठेवी)
विश्वनाथराव पाटील बँक (५१ ते १०० कोटी ठेवी)
गणेश बँक (५० कोटींपर्यंत ठेवी)




