इचलकरंजीत गुरुवारी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन

यड्राव - यड्राव येथील शरद इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग यांच्यावतीने दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन मेळावा गुरुवार (ता.८) रोजी सकाळी १० वाजता श्रीमंत घोरपडे नाट्यगृह, इचलकरंजी येथे आयोजित केला आहे. या मेळाव्यात जेष्ठ करिअर मार्गदर्शक विवेक वेलणकर हे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. प्रमुख पाहुण्या म्हणून इचलकरंजी महानगरपालिकेच्या आयुक्त पल्लवी पाटील या उपस्थित राहणार आहेत.
दहावी, बारावी परिक्षेनंतर महाविद्यालयीन शिक्षण व करिअरची नेमकी दिशा ठरविण्यासाठी हा मार्गदर्शन मेळावात मिळणार आहे. विद्यार्थ्यांना राज्य व केंद्र शासमानाकडून मिळणा-या शिष्यवृत्ती, संस्थास्तरावरील शिष्यवृत्ती, ईडब्ल्यूएस व टीएफडब्ल्यूएस याचा उपयोग प्रवेशासाठी लागणा-या कागदपत्रे सीट डिस्ट्रीव्यशन आणि श्रेणी (कॅटेगीरी) आरक्षण याविषयाची माहीती मिळणार आहे.
दहावी - बारावीच्या नंतरच्या महाविद्यालयीन प्रवेश, उपलब्ध पर्यायांची माहिती, अभियांत्रिकी, आयटीआय, कृषी पदवी, डिफेन्स यासह विविध क्षेत्रातील करिअरच्या संधीची सखोल मार्गदर्शन या मेळाव्यात मिळणार आहे. त्याचबरोबर विविध महाविद्यालये स्टॉलसह सहभागी होणार आहेत.